

मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील शिंदे गटाच्या वाटेवर असताना त्यांची कन्या ठाकरे गटाच्या नगरसेविका राजुल पाटील यांनी रविवारी 'मातोश्री'वर जाऊन उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली आणि आपली निष्ठा ठाकरेंकडेच असल्याचे स्पष्ट केले.
‘आमच्या घरात वैयक्तिक निर्णयाची पद्धत’
भेटीनंतर माध्यमांशी बोलताना राजुल पाटील म्हणाल्या, 'मी माझी भूमिका स्पष्ट केली असून, मी पक्षातच आणि उद्धव साहेबांसोबत आहे. आमच्या घरात प्रत्येकाला वैयक्तिक राजकीय निर्णय घेण्याची पद्धत आहे. माझे वडील त्यांचा निर्णय घेतील, मी माझा निर्णय तुम्हाला कळवला आहे.' राजुल पाटील यांच्या या भूमिकेवर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले असल्याचे समजते.