MHADA Transit Camps : म्हाडाच्या संक्रमण शिबिरांत तब्बल चार हजार घुसखोर

वास्तव्याचे पुरावे सादर न केल्याने हकालपट्टीची कारवाई
MHADA Transit Camps
MHADA Transit Campspudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : नमिता धुरी

संक्रमण शिबिरातील गाळ्यांची होणारी बेकायदेशीर खरेदी-विक्री, गाळ्यांमध्ये होणारी घुसखोरी यांवर उपाय शोधण्यासाठी म्हाडाने सर्व संक्रमण शिबिरांची झाडाझडती गेल्या वर्षी सुरू केली होती. यातून ४ हजार घुसखोर समोर आले असून त्यांच्याकडे वास्तव्याचा कोणताही पुरावा नसल्याने म्हाडाकडून निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे एकूण २० हजार संक्रमण गाळे मुंबईत आहेत. दक्षिण मुंबईतील उपकरप्राप्त इमारती जीर्ण झाल्यानंतर तेथील रहिवाशांना म्हाडामार्फत संक्रमण शिबिरातील गाळे वास्तव्यासाठी दिले जातात; मात्र अनेकदा या गाळ्यांची बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री केली जाते. काही रहिवासी कोणत्याही कागदपत्रांशिवाय संक्रमण गाळ्यांत वास्तव्य करतात. यामुळे गरजू रहिवाशांना देण्यासाठी म्हाडाकडे गाळेच शिल्लक राहात नाहीत.

MHADA Transit Camps
Shahapur Bus Stand Work : शहापूरच्या नवीन आगाराचे काम पुन्हा रखडले...

गेल्या वर्षाच्या सुरुवातीस म्हाडाने संक्रमण शिबिरांमध्ये सर्वेक्षण सुरू केले होते. शिबिरांत राहणाऱ्या सर्व रहिवाशांची कागदपत्रे आणि बायोमेट्रिक पुरावे घेण्यात आले. या सर्व पुराव्यांची तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर ज्यांना म्हाडामार्फत संक्रमण गाळा देण्यात आला आहे, असे मूळ भाडेकरू अ श्रेणीत गणले जातील. ज्यांनी बेकायदेशीर खरेदी-विक्री व्यवहार केला आहे, असे भाडेकरू ब श्रेणीत गणले जातील. ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत, असे रहिवासी क श्रेणीत म्हणजेच घुसखोर म्हणून गणले जाणार आहेत.

MHADA Transit Camps
Karnala Wildlife Conservation : कधी थंडी, तर कधी उष्णता; वन्यजीवांसाठी पाण्याची तरतूद

गाळे रिक्त करण्यासाठी नोटीस

दुरुस्ती मंडळाने वारंवार संधी देऊनही ४ हजार रहिवाशांनी संक्रमण शिबिरातील वास्तव्याची कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत. तसेच त्यांनी बायोमेट्रिक सर्वेक्षणातही सहभाग घेतला नाही. त्यामुळे या सर्वांवर निष्कासनाची कारवाई सुरू करण्यात आली आहे. त्यांना आपल्या ताब्यातील संक्रमण गाळा रिक्त करावा लागणार आहे.

आतापर्यंत ४ हजार पैकी ५०० जणांना नोटिसा पाठवण्यात आल्याची माहिती म्हाडा अधिकाऱ्यांनी दिली. हे सर्व गाळे म्हाडाच्या ताब्यात आल्यास गरजू रहिवाशांना तात्पुरता निवास उपलब्ध होईल. सर्वेक्षणात १५ हजार रहिवाशांनी सहभाग घेतला व १ हजार गाळे रिक्त आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.