Shahapur Bus Stand Work : शहापूरच्या नवीन आगाराचे काम पुन्हा रखडले...

तर जुन्या शौचालयामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्यात; निकामी बसमुळे प्रवाशांची गैरसोय
Shahapur Bus Stand Work
Shahapur Bus Stand Workpudhari photo
Published on: 
Updated on: 

डोळखांब : दिनेश कांबळे

शहापूर एसटी आगाराचे दहा वर्षापूर्वीचे मंजुर काम गेल्या सात महिन्यापासून पुन्हा रखडले असून संबधित आगार प्रमुख, ठेकेदार, तसेच शाखा अभियंता यांचे मध्ये समन्वय नसल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.

तर जुन्या आगारातील शौचालयाचे घाण पाणी आवारात साचल्याने प्रवाशांचे आरोग्य देखील धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.शहापूर एसटी आगारातील निकामी झालेल्या ४७ बस आणि नवीन प्राप्त झालेल्या १० बस मिळून ५५ फेऱ्या वेगवेगळ्या मार्गावर मारीत आहेत. तर या निकामी बस ब्रेकडाऊन व वारंवार पंक्चर होत असल्याने आडवाटेला बस पडून असतात. तर शालेय विद्यार्थी, चाकरमानी, रुग्ण यांसारख्या प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.

Shahapur Bus Stand Work
Illegal Gutkha Sale : मिरा रोडमध्‍ये अनधिकृत दुकानात गुटख्याचा साठा

वाहन चालक व वाहक यांना तारेवरची कसरत करावी लागते. तसेच गेल्या दहा वर्षांपूर्वी मंजूर झालेले तीन कोटी रुपयांचे अंदाजपत्रकाचे एसटी आगाराचे काम पुन्हा सात महिन्यापासून रखडले असल्याने एसटी आगार प्रमुख शेळके तसेच संबधित खात्याचे शाखा अभियंता विजय रेडेकर यांचे मध्ये समन्वय नसल्याने कामाची मुदत संपून देखील विलंब होत आहे. तर कामाला विलंब करणाऱ्या या ठेकेदार कंपनीला पुन्हा तीन कोटीचे काम देऊन त्याचा सन्मान करण्यात आला आहे.

या नवीन इमारतीमध्ये प्लॅटफार्म, हिरकणी कक्ष, वर्कशॉप, निवासस्थान, कंट्रोल रूम, विश्रांती गृह, स्वच्छता गृह आदी व्यवस्था एकाच छताखाली असणार आहेत. परंतु सदर काम अतिशय निकृष्ट तसेच अंदाजपत्रकाप्रमाणे होत नसल्याने या कामाचा स्लॅब दोनदा कोसळला आहे. परंतु अधिकाऱ्यांकडून मात्र याबाबत कारवाई शून्य असल्याचे दिसून येत आहे.

Shahapur Bus Stand Work
Goa Mandrem Galgibaga Blue Flag Beaches - मांद्रे, गालगीबाग समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्कार

ठोस कारवाईची मागणी

त्याचप्रमाणे जुन्या आगारातील कर्मचारी विश्रांतीगृहाचे शौचालयाचे पाईप देखील गेली काही वर्षापूर्वी तुटले असल्याने घाण पाणी आगाराचे आवारात वाहात असल्याने, तसेच परिसरातील छोटे व्यावसायीक टाकाऊ माल आगार परिसरात टाकत असताना देखील आगार व्यवस्थापनाकडून कोणताही ठोस कारवाई आणि कार्यवाही होतांना दिसत नाही. ही संशयास्पद बाब असून नवीन इमारतीचे काम दर्जेदार व्हावे तसेच संबधित यंत्रणेवर ठोस कारवाईची मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.