Karnala Wildlife Conservation : कधी थंडी, तर कधी उष्णता; वन्यजीवांसाठी पाण्याची तरतूद

कर्नाळा पक्षी अभयारण्यात उभारले सिमेंट नाला बांध; उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना मिळणार दिलासा
Karnala Wildlife Conservation
Karnala Wildlife Conservationpudhari photo
Published on: 
Updated on: 

खांदा कॉलनी : सध्या वातावरणात कधी थंडी, तर कधी उष्णतेची तीव्रता जाणवत आहे. बदलत्या हवामानामुळे आगामी उन्हाळ्यात पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन वन्यजीव आणि पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी वनविभागाने आतापासूनच नियोजन केले आहे. पनवेलजवळील कर्नाळा पक्षी अभयारण्यात पावसाचे पाणी अडवून साठविण्यासाठी सहा ठिकाणी लहान सिमेंट नाला बांध उभारण्यात आले आहेत.

सुमारे १२ लाख रुपये खर्चून करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे उन्हाळ्यात अभयारण्यातील मुक्या जीवांना मोठा आधार मिळणार आहे. कर्नाळा पक्षी अभयारण्य हे विविध प्रजातींच्या पक्ष्यांसह अनेक वन्यप्राण्यांचे नैसर्गिक अधिवासस्थान आहे. उन्हाळ्यात जंगलातील नैसर्गिक पाणवठे आटू लागल्याने पक्षी आणि वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

Karnala Wildlife Conservation
Thane Industrial Pollution : खडवलीत कारखाने प्रदूषणाचा प्रश्न कायम

ही संभाव्य अडचण ओळखून पावसाचे पाणी जंगलातच अडवून ठेवण्याची संकल्पना पुढे आली आहे. या उपक्रमाची संकल्पना श्री. रेड्डी सर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव), महाराष्ट्र यांची आहे. तसेच राहुल गवई, उपवनसंरक्षक (वन्यजीव), ठाणे आणि मनोहर दिवेकर, सहाय्यक वनसंरक्षक, कर्नाळा यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला आहे.

वनविभागाचे महत्त्वपूर्ण पाऊल...

अभयारण्यातील डोंगराळ भागातून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. हे पाणी अडवून त्याचा साठा जंगलातच निर्माण व्हावा, यासाठी सहा ठिकाणी लहान सिमेंट नाला बांध उभारण्यात आले आहेत. या बंधाऱ्यांमध्ये साठणारे पाणी आगामी उन्हाळ्यात पक्षी आणि वन्यप्राण्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. कर्नाळा अभयारण्यातील जैवविविधता टिकविण्यासाठी वन्यजीवांचे संवर्धन जितके महत्त्वाचे आहे, तितकेच त्यांच्या पिण्याच्या पाण्याची उपलब्धता राखणेही गरजेचे आहे.

Karnala Wildlife Conservation
Goa Mandrem Galgibaga Blue Flag Beaches - मांद्रे, गालगीबाग समुद्रकिनाऱ्यांना ब्लू फ्लॅग पुरस्कार

उन्हाळा सुरू झाल्यानंतर पाण्यासाठी वन्यजीवांची होणारी भटकंती कमी करण्याच्या दृष्टीने वनविभागाचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बदलत्या हवामानाचे संकेत लक्षात घेऊन मुक्या जीवांच्या पाण्याची सोय आतापासूनच करण्यासाठी वनविभागाने उचललेले हे पाऊल निसर्गप्रेमी आणि पक्षीप्रेमींसाठी समाधानकारक मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.