Mumbai | यांत्रिक हत्तिणीने जिंकली धारावी शाळेतील मुलांची मने

समन्वयक मॅटर्ली फाऊंडेश आणि सैरिक नामक संस्था आणि प्राणी कल्याण संघटना पेटा यांच्या सहकार्याने शाळांत ‘एज्युकेशनल एलिफंट शो’ आयोजित
Mechanical elephant school activity
यांत्रिक हत्तिणीने जिंकली धारावी शाळेतील मुलांची मनेpudhari photo
Published on
Updated on

मुंबई ः धारावीतील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय आणि छत्रपती शिवाजी राजे विद्यालयात आज ऐली नामक यांत्रिक हत्तीण आली आणि तिने शाळेतील बच्चे कंपनीचे मनच नाही, तर ह्रदयही जिंकले. खर्‍या खुर्‍या जंगली हत्तीणीप्रमाणे दिसणारी आणि स्पर्श होताच तिची थरथरणारी त्वचा, तिचे हालणारे सुपाएवढे कान आणि वर-खाली होणारी सोंड पाहून या शाळेतील पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी हरखून गेले. मात्र ऐलीची लहान वयापासून झालेली छळवणूक ऐकून या बच्चेकंपनीचे ह्रदयही हेलावले.

समन्वयक मॅटर्ली फाऊंडेश आणि सैरिक नामक संस्था आणि प्राणी कल्याण संघटना पेटा यांच्या सहकार्याने आज वरील शाळांत ‘एज्युकेशनल एलिफंट शो’ आयोजित केला होता, असे महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्ट-मुंबईचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने यांनी सांगितले.

Mechanical elephant school activity
BJP internal dispute : 14 गावांवरून भाजपात वादाची ठिणगी

वाघ,सिंह,हत्ती, कोल्हा,हरण आदी जंगली प्राण्यांचे मुखवटे घालून शाळेतील मुले अगोदरच ऐलीचे स्वागत करण्यासाठी सज्ज होती. बरोबर 10.30 वाजता एका टेम्पोमधून ऐलीचे शाळेच्या कॅम्पसमध्ये आगमन होताच मुखवटेधारी मुलांनी ऐली... ऐली.....ऐली असा एकच गजर करीत पुष्पवर्षाव करुन तिचे जोरदार स्वागत केले.

पेटा इंडियाची ही ऐली बोलते. ती आपल्या प्रश्नांची उत्तरेही देते. ऐलीला स्पर्श केला की तिची त्वचा खर्‍या हत्तीप्रमाणे थरथरतेही. आपल्या महाकाय शरीराची शान असलेली सोंड, सुपाएवढे कानही हलवते. याची कल्पना गेल्या चार दिवसांपूर्वीच मुलांना शाळेच्या शिक्षकांकडून मिळाली होती. त्यामुळे या यांत्रिक हत्तीणीला कधी स्पर्श करणार, ती प्रतिसाद कसा देणार या विचारांनी मुलांचे मन भरुन गेलेले असतानाच ऐलीची दर्दभरी कथा सुरु होते. मुलेही कान टवकारुन ऐलीचे प्रत्येक वाक्य, प्रत्येक शब्द आपल्या कानात साठवत होते. या 13 मिनिटांच्या या शोमध्ये मुलांना ऐली काही प्रश्न विचारते. या प्रश्नांची उत्तरे ऐकून ऐलीही समाधान व्यक्त करते.

Mechanical elephant school activity
TMC bribery case : लाचखोर पाटोळे होणार निलंबित

या ऐलीला आवाज दिलेला आहे तो अभिनेत्री दिया मिर्झाने. ही ऐली म्हणते, “हॅलो फ्रेंड्स, माझे नाव आहे ऐली. माझे वय आहे 12. मला तीन महिन्यांची असताना जंगलातून साखळदंड बांधून ट्रकमध्ये कोंबून एका सर्कशीत आणण्यात आले. तेथे मला दोन पायांवर उभे राहून सलामी करणे, चेंडू-फळीचा खेळ खेळायला लावले. माझ्या पाठीवरुन रपेट करणे यासारख्या मानसिक, शारीरिक यातनांना मला सामोरे जावे लागले, असे मुलांनो तुमच्याबाबत झालेले चालेल काय? असा थेट प्रश्न ऐली मुलांना करते. तेव्हा मुले एकसुरात म्हणतात “नाही...” या प्रतिकात्मक हत्तीणीला झालेले दु:ख ऐकून चिमुकल्या मुलांचीही मने हेलावली.

ती पुढे म्हणते, “आता मी सर्कशीतून मुक्त झाल्याने तुमच्याशी बोलतेय. पुढे म्हणाली, मलाही भावना आहेत. मला पसंत, नापसंत हेही समजते. मला पाण्यात पोहता येते, मला तुम्हा सर्वांना भेटून खूप आनंद झाला आहे. हत्तीसह कोणत्याही प्राण्यावर बसून रपेट करु नका, हत्तीचा सहभाग असलेली सर्कस पाहू नका, हत्तीसह कोणत्याही प्राण्यास क्रूर, वाईट वागणूक देऊ नका. असे आश्वासन द्याल का मुलांनो मला? या भावनिक प्रश्नावर मुले एकसुरात म्हणाली, “हो ऐली...”

पुढे ऐली म्हणाली, मला चांगली स्मरणशक्ती आहे. फार जुन्या काळातील मला आठवते. मला जंगलातच राहणे आवडते. मित्रांसोबत राहणे मी पसंत करते. हे तिचे बोल ऐकून अनेक मुलांनी पेटाच्या मिनल शहा आणि मिनाक्षी नारंग यांना ऐलीविषयी प्रश्न विचारले. त्याची उत्तरे त्यांनी अतिशय समर्पकपणे देऊन त्यांनी मुलांचे समाधान केले.

याप्रसंगी शोच्या समन्वयक मॅटर्ली फाऊंडेशनच्या आयशा शेख, गिफ्टींग पार्टनर सैरिकचे विनय दुबे, विनय करीर आणि पेटाच्या मिनल शहा आणि मिनाक्षी नारंग यांचा वृक्षांची रोपे देऊन महात्मा फुले एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार बाबुराव माने, प्रिन्सिपल स्वाती होलमुखे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.

सर्कस, उत्सव-धार्मिक सोहळे आणि ओझी वाहणे- फेर्‍या मारणे अशा कामांत खर्‍या हत्तीची मानवाकडून होणारी छळवणूक थांबावी.खर्‍या हत्तींचे कल्याण कसे करावे..आणि खर्‍या हत्तीला वाईट वागणूक देऊ नये.त्याच्याशी गैरवर्तन नकोय अशीही शिकवण या शैक्षणिक एलिफंट शो मधून विद्यार्थ्यांना मिळाली आहे.आणि निश्चितच या शैक्षणिक उपक्रमाने विद्यार्थ्याच्या मनात वन्य प्राण्याविषयी प्रेम,दया वाढण्यास मदत होणार आहे.

बाबुराव माने, संस्थेचे चेअरमन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news