

ठाणे : अनधिकृत बाधंकामप्रकरणी न्यायालयीन चौकशी सुरू असतानाही ठाणे महापालिका अधिकारी बिनधास्त लाच घेऊन अनधिकृत बांधकामांना संरक्षण देण्यात दंग आहेत. त्यातून लाचखोर उपायुक्त शंकर पाटोळे आणि डाटा इंट्री ऑपरेटर ओंकार गायकर व एका खासगी सहकार्याला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी पाटोळे आणि गायकर यांना निलंबित करण्याची प्रक्रिया ठाणे महापालिकेने सुरू केली आहे.
अतिक्रमण प्रतिबंधक विभागाचे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी तीन अनधिकृत गाळे तोडण्यासाठी 25 लाखांची लाच मागितली आणि ते लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या हाती सापडले. त्यांच्या घरातून आणि कार्यालयातून सापडलेल्या डायरी आणि कागदपत्रांमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांना किती हिस्सा देण्यात आला, याची जंत्री सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
लाचखोर पाटोळे याला राजकीय वरदहस्त देणार्या लोकप्रतिनिधींचेही धाबेदणाणले आहेत. पाटोळे याला निलंबित करण्याची प्रक्रिया पालिका प्रशासनाने सुरू केली असून कोणत्याही क्षणी तसे आदेश काढले जातील, असे एका अधिकार्याने सांगितले.