माटुंगा लेबर कॅम्पमध्ये स्लॅब कोसळून २ जखमी

माटुंगा लेबर कॅम्पमध्ये स्लॅब कोसळून २ जखमी
Published on
Updated on

मालाड ; पुढारी वृत्‍तसेवा : मिलिंद नगर हाैसिंग ससोसायटीच्या ए विंग च्या चौथ्‍या मजल्यावरील स्लॅब कोसळून दाेन जखमी झाले. या अपघातात (२३ ) ऋषिकेश पाटील व त्याचा भाऊ अभिषेक पाटील हे जखमी झाले. ही दुर्घटना आज (दि.४) सकाळी घडली.

स्‍लॅब कोसळला त्‍यावेळी  खोलीत दोन्ही मुले झोपली होती. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.

या इमारतीत ही घटना नवीन नसून, वारंवार अशा प्रकारे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असल्याने रहिवाशी चिंताग्रस्त आहेत.

ही इमारत धोकादायक स्‍थितीत असून, या घटनेने इमारतीतील रहिवाश्यांममध्यें भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचलं का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news