Marathi Medium Engineering: इंजिनिअरिंगसाठी मराठीची झेप; राज्यात ४२% विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतायत मातृभाषेत

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नंतर मोठी वाढ; १५४ विषयांचे संपूर्ण साहित्य मराठीत उपलब्ध
Marathi Medium Engineering
Marathi Medium EngineeringPudhari
Published on
Updated on

मुंबई : पवन होन्याळकर

‌‘इंजिनिरींग म्हणजे इंग्रजी‌’ ही समजूत आता मागे पडू लागली असून दहावीनंतर अभियांत्रिकी पदविका (पॉलिटेक्निक) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांचा कल मोठ्या प्रमाणावर माय मराठीकडे वळल्याचे दिसत आहे. यंदा राज्यातील एकूण 1 लाख 7 हजार 910 प्रवेशांपैकी तब्बल 45 हजार 444 विद्यार्थ्यांनी मराठीतून शिक्षण घेत आहेत. म्हणजेच सुमारे 42 टक्के विद्यार्थी तंत्रशिक्षणासाठी मातृभाषेला प्राधान्य दिले आहे. हा आलेख वर्षानुवर्षे वाढत असून अभियंता घडविणाऱ्या वर्गखोल्यांमध्ये आता मराठी शब्दसंपदा घुमू लागली आहे.

Marathi Medium Engineering
Ganesh Naik: लाडकी बहीण योजनेचा इतर खात्यांवर परिणाम; वनमंत्री गणेश नाईक यांची कबुली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांनीही तांत्रिक शिक्षण मातृभाषेत उपलब्ध व्हावे, असा धोरणात्मक आग्रह धरला. त्यानंतर राज्यात 2021-22 पासून प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका विद्यार्थ्यांना मराठी-इंग्रजी द्विभाषिक अध्यापनाची सुविधा देण्यात आली. 2021-22 मध्ये 27 हजार 198 विद्यार्थ्यांनी मराठीतून शिक्षण घेतले. त्यानंतर 2022-23 मध्ये ही संख्या 31 हजार 163 वर गेली. 2023-24 मध्ये 33 हजार 708, 2024-25 मध्ये 39 हजार 689 आणि आता 2025-26 मध्ये ती थेट 45 हजार 444 वर पोहोचली आहे.

Marathi Medium Engineering
Abhijat Marathi Book Exhibition Mumbai: ‘अभिजात’ मराठी पुस्तक प्रदर्शनात साहित्यसंपदेचा महोत्सव; शिवचरित्रांपासून पु.लंपर्यंत वाचकांची गर्दी

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या पुढाकारामुळे आणि तंत्रशिक्षण संचालनालयाने आणि तंत्रशिक्षण मंडळाने केलेल्या भाषा शिक्षणासाठी केलेल्या नियोजनामुळे राज्यात पहिल्यांदाच तंत्रशिक्षण मंडळाकडे उपलब्ध असलेल्या पदविकेचे तब्बल सर्व 154 विषयांचे शिक्षण मराठीतून अनुवादित अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले. यामुळे काही वर्षांत या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशांत मोठी वाढ झाली असल्याची माहिती संचालक डॉ. विनोद मोहितकर आणि मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी दिली.

दरवर्षी हजारोंच्या संख्येने वाढणारा हा कल मराठी माध्यमावरील वाढता विश्वास वाढत आहे. मराठीतून अभियांत्रिकी पदविका राबविणाऱ्या संस्थांची संख्याही वाढत आहे. 2023-24 मध्ये 175 संस्था मराठी माध्यमातून शिक्षण देत होत्या. 2024-25 मध्ये हा आकडा 187 वर गेला आणि 2025-26 मध्ये तो 194 पर्यंत पोहोचला आहे. राज्यातील सुमारे दोनशे संस्थांमध्ये आता मराठी आणि इंग्रजी या दोन्ही माध्यमांतून अध्यापनाची सुविधा उपलब्ध आहे.गेल्या काही वर्षांत मराठीतून अभियांत्रिकी शिकण्याचा पर्याय उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांची संख्याच नव्हे, तर संस्थांची तयारीही वाढली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेतून तंत्रशिक्षण घेण्याचा कल झपाट्याने वाढत आहे.

Marathi Medium Engineering
Marathi Language Schools: मराठी शाळांची पटसंख्या 25% वाढणार; सर्व शाळांत मराठी सक्तीची – दादा भुसे

शिकवली जाणारी पुस्तके मराठीतून

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ यांनी अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमातील सर्व परीक्षेचे सर्व विषय मराठीत उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कॉम्प्युटर इंजिनिअरिंग आणि केमिकल इंजिनिअरिंग या प्रमुख शाखांतील एकूण 154 विषयांचे संपूर्ण शैक्षणिक साहित्य सत्रनिहाय तयार करून विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर निःशुल्क उपलब्ध करण्यात आले आहे. या अंतर्गत प्रथम वर्षाच्या सत्र 1 व सत्र 2 साठी 10 विषय, द्वितीय वर्षाच्या सत्र 3 व सत्र 4 साठी 68 विषय आणि तृतीय वर्षाच्या सत्र 5 व सत्र 6 साठी 76 विषयांचे साहित्य तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारे मंडळाने या विषयांचे संपूर्ण शैक्षणिक साहित्य मराठीत उपलब्ध केले आहे.

Marathi Medium Engineering
Marathi Content Creators: डिजिटल विश्वात मराठीची दमदार एंट्री; आशय, सातत्य आणि कौशल्यावरच लोकप्रियतेचा मंत्र

इंग्लिश व मराठी ह्या दोन्ही भाषांमधून शिक्षण सुरु केल्यामुळे आम्हा सर्व विद्यार्थ्यांना विषय समजण्यास व त्या विषयाचे एप्लीकेशन वापरण्यास आम्हाला खूप मदत होते. शिक्षक दोन्ही भाषेमध्ये समजून सांगत असल्यामुळे त्या विषयाचे बेसिक कन्सेप्ट हे आम्हाला उत्तम रीतीने समजत आहे. कन्सेप्ट पूर्ण समजला असल्यामुळे परीक्षेमध्ये तो लिहिताना त्याची पूर्ण मदत होते.

कल्याणी जाधव, एबीएनएम पॉलिटेक्निक कॉलेज, गंगापूर (छ. संभाजीनगर)

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार अभियांत्रिकीसारख्या अभियांत्रिकी क्षेत्रातही मराठी माध्यमातून शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. 154 विषयांचे संपूर्ण साहित्य मराठीत उपलब्ध करून देणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. येत्या काळात तंत्रशिक्षण अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या मातृभाषेत पोहोचविण्याचा आमचा निर्धार आहे.

चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news