

मुंबई : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा इतर विभागांच्या योजनेवर परिणाम होत असल्याचा आरोप होत असताना आता त्यावर दस्तुरखुद्द वनमंत्री गणेश नाईक यांनीच कबुली दिली आहे. सरकारने लाडकी बहीण ही योजना स्वीकारली असली तर ती अन्य खात्यावर परिणाम करण्याची परिस्थिती निर्माण करीत आहे,
असे नाईक यांनी म्हटले. मात्र, नाईक यांनी वेळीच सारावासारव करत ती योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, सागवान संपत्तीवर 6 हजार कोटींचे कर्ज काढून वन विभागाचा विकास करून पर्यटनाला चालना देणार असल्याचा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला.
मानव - वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी विविध उपाययोजना आखल्या असल्याचे सांगताना मंत्री नाईक यांनी ताडोबा परिसरात 500 फूट रुंदीची बांबूची भिंत उभारण्याचा निर्णय घेतल्याचे नमूद केले.