मुंबई : पुढारी वृत्तसेवा- हिंदु नववर्ष गुढी पाडव्यानिमित्त भारतीय जनता पक्ष आणि लोढा परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या. कोरोनाचा संकट टळल्यानंतर प्रथमच गुढीपाडव्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला.
आपल्या सणांचं, उत्सवांचं, हिंदुधर्मातील प्रथा परंपरांचं ज्ञान येणाऱ्या पिढीला व्हावे, यासाठी गुढी पाडव्याच्या निमित्ताने मराठी हिंदू दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हे अनावरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, आ. आशिष शेलार, आ. पराग अलवानी, खा. पुनम महाजन आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
विलेपार्ले विधानसभेत लोकमान्य सेवा संघातर्फे शताब्दी वर्षाअंतर्गत आयोजित हिंदू नववर्ष स्वागत स्फूर्तीयात्रेत या दिनदर्शिकेचे उद्धाटन करण्यात आले. या दिनदर्शिकेचे वैशिष्ट्य म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांची क्षणचित्रे आणि प्रत्येक मराठी हिंदु महिन्यातील सणांची माहिती यामध्ये विशद करण्यात आली आहे.