

मुंबई : मराठा आंदोलनामुंळे सध्या मुंबईत जोरदार हालचाली सुरु आहेत. मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे हे उपोषणास बसले आहेत. याच पार्श्वभूमीवर आज ओबीसी नेते व अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भूजबळ यांनी आपली भूमिका मांडली. यावेळी ओबीसी कोट्यातून मराठ्यांना आरक्षण दिले तर आम्ही गप्प बसणार नाही. आम्हीही लाखाेंचे मोर्चे काढू असा इशारा भूजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिला.
आमच्या आरक्षणाच्या वाट्यात त्यांचा वाटा नको
भूजबळ यावेळी म्हणाले की आम्हाला २७ टक्केच आरक्षण आहे. त्यात तुम्ही मराठ्यांना घुसवू नका अगोदरच मुळ ओबिसीमध्ये २७ टक्यांमध्ये १७ टक्केच आरक्षण शिल्लक राहिले आहे, ३७४ जाती आहेत. त्यामुळे आमच्यामध्ये त्यांना टाकू नका. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही असा इशारा भूजबळ यांनी दिला
पुढे ते म्हणाले की ओबीसीमध्ये ३७४ जाती आहेत. विविध जातींना वाटून केवळ १७ टक्केच शिल्लक राहिले आहे. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना मी भेटलो, त्यांना मी हेच सांगितले आहे मराठ्यांना तुम्ही आरक्षण द्या पण ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नका.
तुम्ही तयारीला लागा
यावेळी ओबीसी समाजाला आवाहन करताना भूजबळ म्हणाले की जर सरकारने ओबीसीतून मराठ्याना आरक्षण दिले तर तुम्ही शांत बसू नका तयारीला लागा. मोर्चे काढा, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना निवेदने द्या असे आवाहन केले. मराठा समाज आणि सरकार आरक्षणाचे पाहून घेईल पण तुम्ही तयारीला लागावे.