Mumbai Maratha Morcha : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनासंदर्भात आज (दि. २) पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. तुम्ही आझाद मैदानात का थांबला आहात? : आंदोलकांना उच्च न्यायालयाचा सवाल. तसेच तुम्ही देखील आमच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, असे खडेबोलही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला सुनावले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाल्यानंतर आम्ही सुनावणी उद्या (बुधवार, ३ सप्टेंबर) दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करत असल्याचे न्यायालयाने सांगितले.
आझाद मैदानात आंदोलन करण्यास केवळ २४ तासांची परवानगी देण्यात आली होती. तरीही तुम्ही तिथे का थांबाला आहात, असा सवाल करत तुम्ही आदेशाचे उल्लंघन केले आहे, असेही न्यायालाने सांगितले. यावेळी आम्ही शांततेत आझाद मैदानात बसलो आहोत, अशी माहिती जरांगे पाटील यांचे वकील पाटील यांचे वकील सतीश मानेशिंदे यांनी सांगितले. तसेच आाता पर्यंत मराठा आरक्षणासाठी ५४ मोर्चे शांतते निघाले आहेत. अनेक आंदोलनकर्ते पहिल्यांदा मुंबईत आले आहेत. मनोज जरांगे यांनी केलेल्या आवाहनानंतर मुंबई आलेली सर्व वाहने शहराबाहे हटविण्यात येत आहेत. अशी माहिती देत या प्रकरणी गुरुवारी सुनावणी ठेवावी, अशी मागणीही सतीश मानेशिंदे यांनी दिली.
मनोज जरांगे पाटील यांना एक दिवसासाठी तुम्ही परवानगी दिली होती. मात्र यानंतर सलग तुम्ही आंदोलनास परवानगी दिली. ही तुमची चूक आहे. आंदोलनात ५० हजारांपेक्षा जास्त लोक सहभागी झाले तेव्हा तुम्ही काय करत होता, अशी सवालांची सरबत्ती तुम्ही यापूर्वीच न्यायालयात दाद मागायला हवी होती. तुम्ही देखील आमच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे, असे खडेबोलही उच्च न्यायालयाने राज्य सरकारल सुनावले.
आंदोलनासाठी ३१ मेला आम्ही पहिला अर्ज केला. तसेच २५ जुलै २०२५ रोजी दुसरा अर्ज केला होता. या आंदोलनासंदर्भात आम्ही वरिष्ठ अधिकार्यांबरोबर बैठकही झाली. आम्हाला वाहने पार्क करण्यास जागा उपलब्ध करुन दिली नाही. त्यामुळे आम्ही पूर्वकल्पना दिली नव्हती, राज्य सरकारला म्हणता येणार नाही. आता आम्ही कायदा व व्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याचं आवाहन केले आहे, असे सतीश मानेशिंदे यांनी न्यायालयास सांगितले. यावेळी आम्ही सुनावणी उद्या दुपारी एक वाजेपर्यंत तहकूब करत असल्याचे न्यायालयाने सांगितले.
आज दुपारी तीन वाजेपर्यंत मुंबई रिकामी करा, सर्व काही सुरळीत झाले पाहिजे, अन्यथा न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई केली जाईल," असा इशारा आज (दि.२) दीड वाजता मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर आणि न्या. आरती साठे यांच्या खंडपीठाने दीड वाजता झालेल्या सुनावणीवेळी दिला. यावेळी मुंबई निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली राज्य सरकारने परिस्थिती नियंत्रणात आणावी, असे निर्देश दिले. यावेळी वकील सतीश मनेशिंदे यांनी मनोज जरांगे यांची बाजू मांडली. जे काही आंदोलनकर्त्यांकुड त्रास झाला त्याची जरांगे यांच्या वतीने माफी मागतो. 5000 लोकांची परवानगी होती मात्र केवळ 500 जणांच्या पार्किंगची सोय करण्यात आली नाही. तर लोक स्वतःहून आले होते. जेव्हा तुम्हाला 5000 हून अधिक लोक आहेत तुम्ही काय काळजी घेतली , तुम्ही प्रेस नोट काढली का, तुम्ही माध्यमामधून आव्हान केलं का की लोक जास्त झाली आहेत. आम्ही लोकांना माध्यमांमध्ये लोकांना सांगितलं वकिलांचा दावा, आम्ही राज्य सरकार शी देखील संतुष्ट नाही, न्यायाधीशांना पायी चालत यायची पाली आली म्हणून आम्ही राज्य सरकारशी देखील संतुष्ट नाही. त्यांनी तत्काळ जागा खाली करावी त्यांच्याकडे परवानगी नाही नाही तार आम्ही तीन वाजता आदेश देणार, असा इशाराही मुंबई उच्च न्यायालयाचा आंदोलनकर्त्यांना दिला.