Mankhurd Stalking Case: लग्नासाठी हट्ट, तरुणीचा पाच वर्षे पाठलाग; मानखुर्दमध्ये गुन्हा

तरुणीने वारंवार नकार दिल्यानंतरही तो तिचा पाठलाग करत राहिला. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
Crime News
Crime Newspudhari photo
Published on
Updated on

मुंबई: लग्नासाठी सातत्याने दबाव टाकणे, शारीरिक संबंधांची मागणी करणे आणि पाच वर्षांपासून एका तरुणीचा पाठलाग केल्याप्रकरणी मानखुर्द पोलिसांनी २४ वर्षीय तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शिवप्रकाश हरिकेश प्रजापती (वय २४) असे आरोपीचे नाव असून तो मानखुर्दमधील मंडाळा परिसरातील रहिवासी आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार २४ वर्षीय तरुणीही त्याच परिसरात राहते. गेल्या पाच वर्षांपासून आरोपी तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, तरुणीने वारंवार नकार दिल्यानंतरही तो तिचा पाठलाग करत राहिला. तसेच शारीरिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकत असल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Crime News
Private School Teachers: बीएलओ ड्युटीसाठी खासगी शाळांच्या कर्मचाऱ्यांवर दबाव; शिक्षण संघटनांचे महापालिकेविरोधात गंभीर आरोप

१ एप्रिल २०२६ रोजी तरुणी नवी मुंबईतील नेरूळ येथे जात असताना आरोपीने तिचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. याबाबत तरुणीने आपल्या पालकांना माहिती दिल्यानंतर त्यांनी आरोपीला समज देऊन मुलीचा छळ थांबविण्याचा इशारा दिला होता. तरीही आरोपीचे वर्तन कायम राहिल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अखेर सततच्या त्रासाला कंटाळून तरुणीने मानखुर्द पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितामधील संबंधित कलमांनुसार गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. चौकशीदरम्यान आरोपीला समजही देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

४ जून रोजी आरोपी आपल्या आई, भाऊ आणि इतर नातेवाईकांसह तरुणीच्या घरी लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेला. मात्र, तरुणीच्या वडिलांनी हा प्रस्ताव नाकारून त्यांना घराबाहेर जाण्यास सांगितले. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये शाब्दिक वाद झाल्याचेही पोलिसांनी सांगितले.

Crime News
Mumbai schools: एसआयआरसाठी आता अर्धा दिवसच भरणार शाळा; आजपासून वेळापत्रकात बदल

ई-मेल पाठवून धमकी

तरुणीने यापूर्वी नेरूळ पोलिस ठाण्यातही तक्रार केली होती. त्यानंतर तिने आरोपीशी सर्व संपर्क तोडल्यानंतर आरोपीने तिच्या वडिलांना आक्षेपार्ह ई-मेल पाठवून कुटुंबाला गंभीर परिणामांची धमकी दिल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news