Malad Tree Poisoning Case: मालाडमध्ये झाडांना विषारी इंजेक्शन देऊन वाळवल्याचा धक्कादायक प्रकार; सोसायटी पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा

दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळील घटनेमुळे खळबळ; महापालिकेच्या तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
Malad Tree Poisoning Case
Malad Tree Poisoning CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: मालाड पूर्व येथील पठाणवाडी रोड, दिंडोशी मेट्रो स्थानकाजवळ असलेल्या शीतल तपोवन गृहनिर्माण संस्थेच्या प्रवेशद्वारासमोरील दोन झाडांना विषारी इंजेक्शन देऊन वाळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या तक्रारीवरून कुरार पोलीस ठाण्यात सोसायटीचे पदाधिकारी आणि विकासक डी.जी.एस. ग्रुप यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नागरी क्षेत्रे वृक्षांचे संरक्षण व जतन अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Malad Tree Poisoning Case
Pending Court Cases: 'तारीख पे तारीख'चा फेरा कायम; महाराष्ट्रात ४४ लाखांहून अधिक खटले प्रलंबित

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'पी-पूर्व' विभागाला १३ एप्रिल २०२६ रोजी ऑनलाईन तसेच दूरध्वनीद्वारे पठाणवाडी रोड येथील डीजीएस शीतल तपोवन सोसायटीच्या समोरील झाडे सुकवली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली होती.

या तक्रारीच्या अनुषंगाने १४ एप्रिल २०२६ रोजी पालिकेच्या उद्यान विद्या सहायक अधिकारी चैत्रा फलमिंग मावची आणि पर्यवेक्षक पीयूष जोगले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली.

या पाहणीदरम्यान सोसायटीच्या पहिल्या प्रवेशद्वारासमोरील अंदाजे ४ फूट गोलाई व ३० फूट उंची असलेल्या रस्त्यालगतच्या पेल्टोफोरम झाडाच्या बुंध्यावर जमिनीलगत २० ते २२ छिद्रे पाडून त्यात विषारी इंजेक्शन देण्यात आल्याचे आणि दुसऱ्या प्रवेशद्वारासमोरील अंदाजे २ फूट गोलाई व २५ फूट उंचीचे अशोक प्रजातीचे झाड पूर्णपणे सुकलेल्या अवस्थेत आढळले.

Malad Tree Poisoning Case
Mule Account Cyber Fraud: मुंबईत 'म्युल अकाउंट' रॅकेटचा पर्दाफाश; सात जण अटकेत

वृक्ष प्राधिकरणाची कोणतीही पूर्वपरवानगी न घेता अनधिकृतपणे झाडांना विषारी द्रव्य देऊन नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी, पालिकेने दिंडोशी पोलीस ठाणे व कुरार पोलीस ठाण्याशी संपर्क साधून कायदेशीर कारवाईची मागणी केली होती.

त्यानुसार पालिकेच्या उद्यान विद्या सहायक अधिकारी यांच्या फिर्यादीवरून १ ऑगस्ट २०२६ रोजी कुरार पोलीस ठाण्यात डीजीएस शीतल तपोवन सोसायटीचे पदाधिकारी आणि विकासक डी.जी.एस. ग्रुप यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news