MBA Student Blackmail Case: मालाडमध्ये MBA विद्यार्थ्याला ब्लॅकमेल; परीक्षेच्या गैरप्रकाराची भीती दाखवून २४ लाखांची खंडणी

कॉलेज कर्मचारी असल्याचे सांगून आरोपीने केली फसवणूक; निकाल लागल्यानंतरही पैशांची मागणी सुरूच
MBA Student Blackmail Case
MBA Student Blackmail CasePudhari
Published on
Updated on

मुंबई: शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये एमबीए अभ्यासक्रमांत शिकणार्‍या बांधकाम व्यावसायकिाच्या मुलाला ब्लॅकमेल करुन २४ लाखांची खंडणी वसुलीचा धक्कादायक प्रकार मालाड परिसरात उघडकीस आला आहे.

याप्रकरणी आलोक केशरी या आरोपीविरुद्ध बांगुरनगर पोलिसांनी खंडणीसह फसवणुक आणि आयटी कलमांतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

२१ वर्षांचा तक्रारदार तरुण मालाड येथे राहत असून सध्या कॉलेजमध्ये एमबीएचे शिक्षण घेत आहे. आलोकने त्याला कॉलेजचा कर्मचारी असल्याचे सांगून तो स्टुडंट कौन्सिलर म्हणून काम करतो, असे सांगितले होते.

MBA Student Blackmail Case
Subhash Chandra CBI Case: सुभाष चंद्रांशी संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा; एलआयसी हाउसिंग घोटाळ्यात सीबीआयची कारवाई

जूनमध्ये एमबीएच्या पहिल्या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. परिक्षेपूर्वी विद्यार्थ्यांना परिक्षेत गैरप्रकार होणार असल्याचा अलर्ट देण्यात आला होता. २१ जूनला सर्व विद्यार्थ्यांना दुसरा अलर्ट असलेला मॅसेज व्हायरल झाला आणि परिक्षेचे ऍप्लिकेशन बंद करण्यात आले.

MBA Student Blackmail Case
Andheri Extortion Case: आयकर अधिकारी असल्याचे भासवून अंधेरीत १ कोटींची खंडणी; सहा जणांना अटक

आलोकने तक्रारदार तरुणाला कॉल करुन त्याचे परिक्षेच्या गैरप्रकारात नाव आल्याने त्याला कॉलेजमधून काढून टाकणार आहे. त्याला दुसर्‍या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नसल्याची भीती घातली. या संपूर्ण प्रकरणातून त्याला बाहेर काढण्यासाठी त्याने त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. भीतीपोटी त्याने त्याला त्याच्या दोन्ही बँक खात्यातून २४ लाख ६४ हजार ३२० रुपये ट्रान्स्फर केले होते.

निकाल लागल्यावरही पैशांची मागणी

रक्कम मिळाल्यानंतर त्याला अंतर्गत पातळीवर प्रकरण मिटवून त्याला क्लिनचिट देतो असे सांगून काम न झाल्यास त्याला त्याची संपूर्ण रक्कम परत करण्याचे आश्‍वासन दिले होते. त्याचा विश्‍वास बसावा म्हणून त्याने त्याला १ लाख १५ हजार रुपये पाठविले होते.

याच दरम्यान त्याचा पहिल्या सेमिटरचा निकाल लागला होता, त्यात तो उत्तीर्ण झाला होता. यावेळी आलोकने त्याला निकाल लागला असला तरी तो अद्याप ब्लॅकलिस्ट आहेस, प्रकरण अजून संपले नाही. त्यासाठी त्याला आणखीन पैसे द्यावे लागेल, असे सांगून त्याला ब्लॅकमेल करुन पैशांची मागणी सुरु केली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news