Mahayuti Government Scheme | ‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळणार नाही; ‘शिवभोजन थाळी’च्या बजेटमध्येही मोठी कपात?

अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांची माहिती
 Mahayuti Government Scheme
संग्रहित छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

मुंबई : राज्यात सणासुदीच्या काळात शिधापत्रिका धारकांसाठी दिला जाणारा ‘आनंदाचा शिधा’ यंदा मिळणार नाही, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. राज्याची आर्थिक स्थिती सध्या कमकुवत असल्याने महायुती सरकारने सुरू केलेल्या या योजनेला यंदा कात्री बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना यंदा 'आनंदाचा शिधा’पासून वंचित राहवे लागण्याची शक्यता आहे.

राज्याच्या तिजोरीवर ताण

राज्याच्या तिजोरीवर ताण आल्याने सध्याची आर्थिक परिस्थिती डळमळीत असल्याने सरकारला अनेक योजनांमध्ये कपात करावी लागत आहे. त्याचा फटका ‘आनंदाचा शिधा’ योजनेलाही बसला आहे. सणासुदीच्या काळात गरीब व गरजू शिधापत्रिका धारकांना अतिरिक्त धान्य, साखर, तूरडाळ, खाद्यतेल आदी वस्तू ‘आनंदाचा शिधा’ म्हणून दिल्या जात होत्या. मात्र, यंदा ही सुविधा मिळणार नाही.

 Mahayuti Government Scheme
Devendra Fadnavis | 'निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, पण युती शक्य नसेल तर...'; CM फडणवीस काय म्हणाले?

‘शिवभोजन थाळी’वरही परिणाम

‘शिवभोजन थाळी’साठी यापूर्वी ६० कोटी रुपयांची तरतूद होती, ती आता फक्त २० कोटी रुपयांवर आणण्यात आली आहे. त्यामुळे थाळ्यांची संख्याही वाढणार नाही. बजेट कपात झाल्याने शिवभोजन थाळ्यांची संख्या वाढवण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

अनेक योजनांवर गंडांतर

राज्याच्या आर्थिक अडचणीमुळे केवळ ‘आनंदाचा शिधा’ नव्हे, तर इतरही अनेक सामाजिक योजनांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. सणासुदीच्या काळात गरीब कुटुंबांना दिलासा देणाऱ्या या योजनांमध्ये कपात झाल्याने सामान्य जनतेवर त्याचा मोठा परिणाम जाणवणार आहे.

 Mahayuti Government Scheme
Sunil Tatkare| महायुती अभेद्य असेल : प्रदेशाध्यक्ष तटकरे

दरम्यान, राज्य सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नसली तरी, अन्न व नागरी पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा ‘आनंदाचा शिधा’ मिळण्याची शक्यता धूसर आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात गरजू कुटुंबांना यंदा अतिरिक्त शिध्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news