Maharashtra Work Hours Bill: कामाचे तास वाढविणारे विधेयक सरकारने घेतले मागे; कामगारांच्या विरोधाला यश

दुकाने व आस्थापनांमधील कामाचे तास वाढवण्याच्या प्रस्तावावर स्थगिती; पुन्हा अभ्यासानंतर निर्णय
Maharashtra Work Hours Bill
Maharashtra Work Hours BillPudhari
Published on
Updated on

मुंबई : राज्यातील दुकाने आणि खासगी आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांचे दैनंदिन कामाचे तास वाढविण्यास मान्यता देणारे विधेयक राज्य सरकारने सोमवारी मागे घेतले. कामगारमंत्री आकाश फुंडकर यांनी हे विधेयक मागे घेण्याचा प्रस्ताव विधानसभेत मांडला आणि तो मान्य करण्यात आला.

Maharashtra Work Hours Bill
‌Maharashtra politics : ‘एस.पीं.‌’सह तिघांचे निलंबन सभापतींनी रोखले

या विधेयकातील तरतुदींबाबत पुरेशी स्पष्टता नसल्याने तसेच कामाचे तास वाढविण्यास होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती कामगार विभागातील सूत्रांनी दिली.

Maharashtra Work Hours Bill
stock market crash | शेअर बाजार, रुपया कोसळला; डॉलरचा भाव 94 रुपयांच्या उंबरठ्यावर

राज्य सरकारने ‌‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियमा‌’त सुधारणा करून कामाचे तास 9 वरून 10 करणे, कार्यकालयोजन 12 तासांपर्यंत वाढवणे आणि विश्रांतीविना 6 तास कामाची मुभा देणे, अशा तरतुदी प्रस्तावित केल्या होत्या.

Maharashtra Work Hours Bill
Devendra Fadnavis| सातारा जि.प. प्रकरणाची सखोल चौकशी ः मुख्यमंत्री

मात्र, या नव्या प्रस्तावित नियमांवरून कामगार जगतात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. कामगार संघटना आणि काही आस्थापनांमध्येही मतमतांतरे पाहायला मिळाली. विशेषतः, सलग 6 तास काम आणि वाढीव कार्यकालयोजन यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर आणि कार्यक्षमतेवर काय परिणाम होईल, याबाबत स्पष्टता नव्हती. त्यामुळे सर्व तांत्रिक आणि व्यावहारिक बाबींचा सखोल अभ्यास करून हे विधेयक पुन्हा मांडले जाईल, अशी माहिती कामगार विभागातील सूत्रांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news