stock market crash | शेअर बाजार, रुपया कोसळला; डॉलरचा भाव 94 रुपयांच्या उंबरठ्यावर

stock market crash
stock market crash | शेअर बाजार, रुपया कोसळला; डॉलरचा भाव 94 रुपयांच्या उंबरठ्यावर
Published on
Updated on

मुंबई; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या इंधन प्रकल्पांवर हल्ल्याची धमकी दिल्याने जागतिक अस्थिरता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्याचे जोरदार पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स 1,836 आणि निफ्टी निर्देशांक 601 अंकांनी गडगडला. एका डॉलरचा भाव 94 रुपयांच्या उंबरठ्यावर पोहोचला आहे.

मुंबई शेअर बाजारात (बीएसई) सेन्सेक्स 2.46 टक्क्यांनी घसरून 72,696 अंकांवर आला. राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) निफ्टी निर्देशांक 2.60 टक्क्यांनी घटून 22,512 अंकांवर आला आहे. बीएसई मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांक प्रत्येकी चार टक्क्यांनी कोसळले. परिणामी, बीएसईतील गुंतवणूकदारांचे 14 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. बीएसईतील कंपन्यांचे भांडवली मूल्य 428.76 वरून 414.76 लाख कोटी रुपयांवर आले आहे. निफ्टी रिअल्टी, मेटल, आयटी निर्देशांकांत घसरण झाली.

आखाती देशांतील युद्धस्थिती गंभीर झाल्याने इंधन दराचा भडका उडाला आहे. तसेच, विदेशी गुंतवणूक संस्थांनी शेअर बाजारातून गुंतवणूक काढून घेतल्याने रुपयावरील बोजा वाढला आहे. परिणामी, सोमवारी (दि. 23) एका डॉलरच्या तुलनेत रुपया 26 पैशांनी कमकुवत होऊन डॉलर 93.97 पर्यंत गेला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news