‌Maharashtra politics : ‘एस.पीं.‌’सह तिघांचे निलंबन सभापतींनी रोखले

विधान परिषदेत महायुतीचे नेते आमने-सामने; भाजप-शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा आक्रमक पवित्रा
‌Maharashtra politics
‌Maharashtra politics
Published on
Updated on

मुंबई/सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिंदे गटाच्या मंत्र्यांना धक्काबुक्की झाल्याच्या पार्श्वभूमीवर विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले. यावरून शिवसेना-भाजपमध्ये खडाजंगी झाली. मंत्री जयकुमार गोरे आणि भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांच्या आक्षेपानंतर सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा हा निर्णय राखून ठेवला.

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना झालेल्या धक्काबुक्कीचे पडसाद सोमवारी विधान परिषदेत उमटले. एका मंत्र्यावरच अशी परिस्थिती येत असेल, तर सभागृहातील सदस्यांनी कोणाकडे न्याय मागायचा, असा सवाल शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदारांसह मंत्री शंभूराज देसाई यांनी केला.

सातारा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांना निलंबित करण्याची मागणी केली. सदस्यांच्या मागणीचे गांभीर्य पाहून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पोलिस अधीक्षक दोषी यांच्यासह तीन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबनाचे निर्देश दिले. त्यावर जयकुमार गोरे यांनी या आदेशाला कडाडून विरोध करत शिंदे गटाचे मंत्रीच कसे चुकीचे वागले, याचा पाढा वाचला.

पुन्हा एकदा विधान भवनात ‌‘पुढारी‌’चा दणका

सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या ऐतिहासिक राड्यानंतर ‌‘पुढारी‌’ने अत्यंत आक्रमक भूमिक घेतली. ‌‘पुढारी‌’च्या या भूमिकेचे पडसाद साताऱ्यापासून ते विधिमंडळापर्यंत उमटले. यशवंतराव चव्हाण यांच्या सातारा जिल्ह्याच्या या प्रकरणात झालेल्या बदनामीचे पडसादही विधिमंडळात उमटून विधान भवन दणाणले. ‌‘पुढारी‌’च्या दणक्याची जोरदार चर्चा विधान भवनात सुरूहोती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news