Maharashtra State Women Commission chairperson : महिला आयोग अध्यक्षपद; महायुतीत रस्सीखेच

नेत्यांच्या आयात-निर्यातीच्या चर्चांना वेग; इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता
Maharashtra State Women Commission chairperson
महिला आयोग अध्यक्षपद; महायुतीत रस्सीखेचpudhari photo
Published on
Updated on

मुंबई : रूपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त आहे. महायुतीतील सत्तावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसकडे हे पद आहे. या पदासाठी इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू आहे. मात्र राष्ट्रवादीच्या नव्या नेतृत्वाकडून महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी आयात महिला नेत्याची वर्णी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतील इच्छुकांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे.

महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा शिंदे, डॉ. ज्योती मेटे आणि सुनेत्रा पवार यांच्या निकटवर्तीय वैशाली मोठे यांची नावे चर्चेत होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधून शिवसेनेत प्रवेश करत शायना एनसी यांनी मुंबादेवी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. मात्र काँग्रेसच्या अमिन पटेल यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. या पराभवानंतर शायना एनसी या पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यसभा उमेदवारीसाठी त्यांनी प्रयत्न केले.

Maharashtra State Women Commission chairperson
Goa News | गोव्यात महिला आयोगाचे अध्यक्षपद दोन महिन्यांपासून रिक्त! सरकार महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर आहे का?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंचे नाव नक्की केले. विधान परिषदेच्या निवडणुकीतही शायन एनसी यांनी प्रयत्न केले. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा आहे.

Maharashtra State Women Commission chairperson
Women Reservation Bill : महिला आरक्षणासाठी जनमताच्या रेट्याने विरोधकांना गुडघ्यावर आणू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शायना एनसी यांनी घेतली सुनेत्रा पवार यांची भेट

सध्या शिवसेनेत असलेल्या शायना एनसी यादेखील या पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा आहे.त्यांनी अलीकडेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची ‌‘देवगिरी‌’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतल्याचे समजते. या भेटीनंतर त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना सुरुवात झाली आहे. महिला आयोगाचे अध्यक्षपद आणि राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदासाठी वैशाली नागवडे, रूपाली ठोंबरे, प्रेरणा बलकवडे, सुरेखा ठाकरे आणि राजलक्ष्मी भोसले यांची नावे चर्चेत आहेत. लवकरच याबाबत निर्णय अपेक्षित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news