ST Bus: एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी! बसस्थानकांवर आता दुमजली स्वच्छतागृहे आणि स्नानगृहे; १०० कोटींची तरतूद

राज्यातील बसस्थानकांवर अत्याधुनिक दुमजली प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
MSRTC bus station facilities
MSRTC bus station facilitiesFile Photo
Published on: 
Updated on: 

ST Bus Stand Facilities

मुंबई : राज्यातील निवडक बसस्थानकांवर जेजुरी बसस्थानकाप्रमाणे अत्याधुनिक दुमजली प्रसाधनगृहे उभारण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी एसटी महामंडळाने १०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

या प्रसाधनगृहांमध्ये महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतालयांची व्यवस्था असेल. तसेच रात्रीच्या वेळी बसस्थानकावर मुक्कामी येणाऱ्या प्रवाशांना सकाळी पुढील प्रवासासाठी निघण्यापूर्वी अंघोळ करता यावी, यासाठी स्वतंत्र स्नानगृहांची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे.

MSRTC bus station facilities
Central Railway DRM | मुंबई रेल्वेला अखेर मराठी अधिकारी मिळाला; प्रवासी संघटनांच्या पाठपुराव्याला मोठे यश

या प्रसाधनगृहांची स्वच्छता आणि देखभाल व्यवस्थित राखली जावी, यासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोयही त्याच ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यामुळे प्रसाधनगृहांची नियमित स्वच्छता आणि देखभाल करणे अधिक सुलभ होईल, असा दावा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केला आहे.

सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर विकसित न होणाऱ्या बसस्थानकांवर एसटी महामंडळ स्वतःच्या खर्चातून ही कामे करणार आहे. एसटी प्रवास केवळ सुरक्षित आणि आरामदायीच नव्हे, तर स्वच्छ व आरोग्यदायीही असावा, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या सुविधांमुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, रात्री प्रवास करणारे प्रवासी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून राज्यातील एसटी बसस्थानकांचा चेहरामोहराही बदलणार आहे, असा विश्वासही सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

MSRTC bus station facilities
Koyna Dam Water Dispute : कोयनेचे ‘अवजल’ मुंबईला... हा तर महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याचा आणखी एक प्रयत्न!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.