Mumbai Goa Highway Update: मुंबई-गोवा महामार्गाला अखेर वेग; मे 2026 पर्यंत बहुतांश कामे पूर्ण होणार

सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची विधान परिषदेत माहिती; माणगाव-इंदापूर बायपास वगळता उर्वरित मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर
Mumbai-Goa National Highway
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गPudhari File Photo
Published on
Updated on

मुंबई : होळी तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची आता वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामांनी वेग घेतला आहे. त्यामुळे माणगाव व इंदापूर बायपास वगळता उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग मे महिन्यापर्यंत पूर्णत्वाला जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विधान परिषदेत दिली.

Mumbai-Goa National Highway
HPV Vaccination Mumbai: मुंबईत एचपीव्ही लसीकरण मोहिमेची सुरुवात; 14 वर्षांच्या मुलींना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण

विधान परिषदेत भाजपचे आमदार ॲड. निरंजन डावखरे यांनी मुंबई-गोवा महामार्गाच्या प्रलंबित कामाबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी सहभाग घेताना म्हटले की, या महामार्गावरून जाताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. समृद्धी महामार्ग झाला, पण मुंबई-गोवा महामार्ग गेली अनेक वर्षे कंत्राटदारांमुळे रखडला गेला आहे. त्यामुळे हा महामार्ग कधी पूर्ण होणार आणि गांधारपाले लेणी येथे पर्यटनाच्या दृष्टीने बांधकाम विभागाने पुढाकार घ्यावा,

Mumbai-Goa National Highway
Daivi Sampatti in Dnyaneshwari: अपैशुन, दया, अलोलुप्त आणि मार्दव : दैवी संपत्तीतील जीवनाला उन्नत करणारे चार रत्न

अशी मागणीही दरेकर यांनी यावेळी केली. तसेच अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे यांनीही महामार्गासंदर्भात उपप्रश्न विचारले. या प्रश्नाच्या उत्तरात मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माणगाव व इंदापूर बाह्य वळण मार्गासह तीन रेल्वे उड्डाणपूल आणि दोन मोठ्या पुलांच्या कामांचा समावेश आहे. जुलै 2025 मध्ये ही कामे सुरू केली आहेत. संबंधित ठेकेदार काम करत नसल्याने नवीन ठेकेदार नेमला. सध्या माणगाव-इंदापूर बायपास या भागातील रेल्वे उड्डाणपुलाचे काम नव्या एजन्सीमार्फत प्रगतिपथावर आहे.

Mumbai-Goa National Highway
Global Warming: ग्लोबल वॉर्मिंग आणि ओझोन थर: पृथ्वीच्या संरक्षणकवचावरचं दुहेरी संकट

जुलै 2027 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर माणगाव येथे वाहतूक कोंडी होणार नाही. चिपळूण येथील पुलाचेही मुख्य काम पूर्ण झाले असून, मे 2026 पर्यंत तो वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला केला जाईल. तसेच संगमेश्वर येथील हातखंबा उड्डाण पुलाचे काम एप्रिल अखेरपर्यंत पूर्ण होईल. येत्या गणेशोत्सवातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी माणगाव-महाड मार्गावरील ताम्हिणी घाटाचा बाह्य वळण मार्ग पावसाळ्यापूर्वी (मे महिन्यात) पूर्ण करण्याचा शासनाचा मानस असल्याचे भोसले यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news