Maharashtra SIR 2026: महाराष्ट्रातील मतदार यादीत मोठी उलथापालथ? १ कोटी २२ लाखांहून अधिक नोटिसा; १६ नोव्हेंबरला अंतिम यादी

सर्वाधिक नोटिसा कोकण विभागात, तर सर्वांत कमी अमरावती विभागात
Notice
NoticePudhari
Published on: 
Updated on: 

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: राज्यात ३६ जिल्ह्यांतील विधानसभा मतदारसंघांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान मतदार यादीतील मोठ्या प्रमाणातील विसंगती, त्रुटी समोर आल्या आहेत.

आजपर्यंत राज्यातील २८८ मतदार संघांत १ कोटी २२ लाख २१ हजार ४०८ नोटिसा तयार केल्या आहेत. त्यापैकी १ कोटी २१ लाख ७७ हजार ९५१ बजावण्यात आल्या. आजपासून सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांनी सुनावणी घेण्यास सुरुवात केली आहे.

Notice
Mumbai Income Tax Raids: बॉलीवूडमध्ये आयकर छापे; पॅनोरमा, कुमार मंगत पाठक, वासू भगनानी, रकुलप्रीत यांच्या कार्यालयांची झडती

सुनावणी झाल्यानंतर १६ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी तयार करण्यात येणार आहे. सर्वाधिक नोटिसा कोकण विभागात तर सर्वात कमी अमरावती विभागात देण्यात आल्या आहेत.

राज्यात विधानसभानिहाय मतदारसंघांमध्ये भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेदरम्यान अनेक त्रुटी समोर आल्या आहेत. त्यामध्ये नाव, जन्मतारीख, वय चुकीचे असल्याचा समावेश आहे.

घरोघरी जाऊन ही प्रगणक प्रपत्र जमा न केल्यामुळे आणि संगणकीय पडताळणीत ओळख न पटल्यामुळे अनेक मतदारांची नावे बाद करण्यात आली आहेत. एसआयआर मोहिमेदरम्यान जिल्हा निवडणूक प्रशासनाने २००२ च्या मूळ मतदार यादीतील नोंदींशी २०२४ च्या मतदार यादीचे संगणकीय मॅपिंग केले.

Notice
Santacruz Manhole Accident: मुंबईत मॅनहोल सफाई ठरली जीवघेणी! दोन कामगार पडले; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

त्यानंतर प्रत्यक्ष घरभेटीद्वारे मतदारांची माहिती पडताळण्यात आली. या प्रक्रियेत मतदाराचा पत्ता उपलब्ध नसणे, मतदार स्थलांतरित होणे, मृत्यू झालेला असणे, दुबार नोंद असणे अथवा इतर कारणांमुळे नोंदीत विसंगती आढळल्यास संबंधित मतदाराकडून आवश्यक कागदपत्रे मागविण्याची प्रक्रिया करण्यात आली होती.

त्यानंतर विधानसभा मतदारसंघात नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. एसआयआरअंतर्गत प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या किंवा नोंदीमध्ये चुकीची माहिती असलेल्या नागरिकांना दावे व हरकती दाखल करण्याची संधी देण्यात आली आहे.

प्राप्त दावे व हरकतींवर आजपासून सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्यामार्फत सुनावणी घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे. १६ नोव्हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news