Santacruz Manhole Accident: मुंबईत मॅनहोल सफाई ठरली जीवघेणी! दोन कामगार पडले; एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

गोळीबार रोडवरील घटनेत अजय ठाकूर यांचा मृत्यू; संतोष कास्टे यांची प्रकृती चिंताजनक
Santacruz Manhole Accident
Santacruz Manhole AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: गोरेगावच्या पूर्वेला सार्वजनिक शौचालयात गुदमरून दोन मुलांचे बळी रविवारी रात्री गेले आणि सोमवारी दुसऱ्याच दिवशी सांताक्रूझ पूर्व येथील गोळीबार रोड क्रमांक ८ वर मॅनहोलची सफाईचे काम करताना दोन खासगी कामगार मॅनहोलमध्ये पडून अजय ठाकूर (३०) या कामगाराचा मृत्यू झाला तर संतोष कास्टे (५०) याची प्रकृती चिंताजनक आहे.

या भयंकर प्रकारामुळे खासगी पद्धतीने मॅनहोलची सफाई किती जीवघेणी ठरू शकते याचा प्रत्यय आला.

Santacruz Manhole Accident
Diwali Special Trains: पूजा, दिवाळीसह छठ उत्सवासाठी ४१८ विशेष गाड्या

गोळीबर रोड क्रमांक ८ येथील भव्या निकेतन या सोसायटीने इमारतीच्या अंतर्गत सांडपाणी वाहिनीच्या सफाईचे काम अज्ञात खासगी व्यक्तींना दिले होते. हे काम सोसायटीच्या आवारातील अंतर्गत ड्रेनेज लाईनशी संबंधित होते. सफाईदरम्यान संबंधितांनी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना माहिती न देता पालिकेचे मॅनहोल उघडले आणि दोघे कामगार त्यात पडले.

माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दोघांना बाहेर काढून व्ही. एन. देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असता अजय ठाकूर याला डॉक्टरांनी रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित केले, तर संतोषला एमआयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Santacruz Manhole Accident
Airoli Theatre: १२ वर्षांची प्रतीक्षा संपणार! ऐरोली नाट्यगृहाचे काम ९० टक्के पूर्ण; २०२६ मध्ये पडदा उघडणार

पालिका एच.पूर्व विभागातील प्रशासनाने सबंधित सोसायटीविरोधात बेकायदेशिरपणे मॅनहोल उघडल्याबद्दल आणि कामगाराचा बळी गेल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news