Maharashtra Revenue Camp 2026: एका दिवसात 15 महसूल सेवा निकाली; ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान’ अभियानाची घोषणा

मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय; शेतकरी, विद्यार्थी, महिलांसाठी राज्यभर विशेष शिबिरे
Maharashtra Revenue Camp 2026
Maharashtra Revenue Camp 2026Pudhari
Published on
Updated on

मुंबई : शिवजयंतीच्या महापर्वावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान जाहीर केले असून, हे अभियान राज्यातील सर्व मंडल तसेच नगरपालिका, नगरपंचायतीच्या क्षेत्रात पुढच्या दोन महिन्यात सहा दिवस घेतले जाणार आहे.

Maharashtra Revenue Camp 2026
Raj Thackeray Eknath Shinde Meeting: राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

बावनकुळे म्हणाले , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केल्यानंतर सर्वसामान्य जनता, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि महिलांसाठी असलेल्या महसूल विभागातील महत्वाच्या 15 स्वरुपातील सेवा एकाच दिवसात मार्गी लावल्या जाणार आहेत. त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान (टप्पा-1) राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महसूल मंडल आणि नगर परिषद, नगर पंचायत स्तरावर भव्य शिबिरे भरवली जाणार आहेत.

Maharashtra Revenue Camp 2026
Rajya Sabha Election Maharashtra: मविआसमोर सहमतीच्या उमेदवाराचे मोठे आव्हान

या अभियानांतर्गत महसूल विभागाने एकूण 15 पेक्षा जास्त प्रमुख सेवा थेट शिबीर स्थळी देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. प्रलंबित फेरफार, 7/12 मधील चुकांची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे 7/12 आणि 8-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी आणि जातीचे प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेअर प्रमाणपत्र, अकृषिक तरतुदींबाबत मार्गदर्शन व सुधारणा, नवीन व्यवस्थापनानुसार सनद प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यांसाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायद्याच्या उल्लंघनाबाबतच्या प्रकरणांचा निपटारा,

Maharashtra Revenue Camp 2026
Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त

पाणंद रस्त्यांच्या प्रशासकीय मान्यतेचे आदेश, घरांसाठी पट्टे वाटप, ई-मोजणी अर्ज, भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी कमी-जास्त पत्रके तयार करून गाव दप्तर अद्यावत केली जाणार आहेत. अकृषिक परवानगीही या शिबिरातून दिली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य मिळकतधारकांचा मोठा वेळ आणि पैसा वाचणार आहे.

Maharashtra Revenue Camp 2026
BMC Standing Committee: पालिकेच्या स्थायी समितीवर श्रद्धा जाधव; ठाकरेंकडून ‘तिजोरी’ची जबाबदारी सोपवली

असे असेल अभियान

मंडळ स्तरावर पूर्व तयारी : 18 फेब्रुवारी ते 5 मार्च.

मार्च महिन्यातील शिबिरे: 7 मार्च (शनिवार) आणि 14 मार्च (शनिवार).

एप्रिल महिन्यातील शिबिरे: 10 एप्रिल (शुक्रवार) आणि 17 एप्रिल (शुक्रवार).

मे महिन्यात नगरपरिषद/नगरपंचायत स्तरावर शिबिरे: 8 मे (शुक्रवार) आणि 15 मे (शुक्रवार).

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news