Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त

पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त
Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त
Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्तPudhari
Published on
Updated on

पनवेल/कळंबोली : पनवेलमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा न सुरू करणाऱ्या तसेच मीटरचे सील तुटलेले, रिक्षांचे अनियमित कागदपत्रे, कागदपत्रांची पूर्तता न करणे तसेच शहरात वाढत्या तक्रारी, चोरींच्या घटनांमध्ये वाढ आणि प्रवाशांकडून होणाऱ्या भाडेवाढीच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर पनवेल परिवहन विभागाने धडक कारवाई केली आहे.

Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त
Morba Branch Canal Burst: पाटबंधारे विभागाच्या हलगर्जीपणाचा कळस; कालवा फुटून कडधान्य पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान

विशेष तपासणी मोहिमेत तब्बल 124 वाहनांवर कारवाई करण्यात आली असून त्यापैकी 42 रिक्षा पनवेल वाहतूक शाखेत जप्त करण्यात आल्या आहेत. ही संपूर्ण धडाकेबाज अन्‌‍ खळबळ उडून देणारी कारवाई परिवहन अधिकारी दिलीप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. यामध्ये परिवहन विभागाचे सहा अधिकारी व दहा सहाय्यक अधिकारी व वाहतूक पोलीस शाखेचे 40 कर्मचारी अधिकारी यांच्या सहभागामुळे पनवेल रेल्वे स्टेशनच्या नवीन पनवेल बाजूस व पनवेल बाजूस, शहरातील विविध चौक, रेल्वे स्थानक परिसर आणि प्रमुख रस्त्यांवर अचानक तपासणी करत नियमभंग करणाऱ्या रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त
Revdanda Salav Bridge Construction: रेवदंडा–साळाव पुलाचे नव्याने बांधकाम सुरू; सागरी महामार्ग प्रकल्पाला वेग

मागील काही दिवसांपासून प्रवाशांकडून भाडे नाकारणे, मीटरप्रमाणे प्रवास न करणे, तसेच अवैध प्रवासी वाहतूक यासंदर्भात तक्रारी वाढल्या होत्या. याशिवाय चोरींच्या घटनांमध्ये काही संशयित वाहनांचा वापर होत असल्याची माहितीही प्रशासनाला मिळाली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने कठोर पावले उचलत कारवाईचा बडगा उगारला. अधिकाऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी सर्व कागदपत्रे वैध ठेवून, मीटरप्रमाणेच प्रवासी वाहतूक करावी, अन्यथा थेट जप्तीची कारवाई टळणार नाही.

Panvel Auto Rickshaw action: पनवेलमध्ये धडक कारवाई; नियमभंगाबद्दल 124 वाहनांवर दंड, 42 रिक्षा जप्त
Mahad Girl Missing Case : दूध आणण्यासाठी गेलेली 'ती' घरी आलीच नाही, पालक चिंतेने व्याकूळ, महाडमध्ये खळबळ

पनवेलमधील रिक्षा चालकांच्या बाबत मीटर प्रमाणे रिक्षा चालवत नसल्याच्या तक्रारी अनेक दिवसांपासून होत्या. तसेच रिक्षा चालकांबाबतही तक्रारी होत्या. याबाबत आज धडक कारवाई करून रिक्षाही जप्त करण्यात आल्या आहेत. रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांच्या कागदपत्रांची नियमितता करून घेतल्यानंतरच जप्त केलेल्या रिक्षा शासकीय योग्य तो दंड आकारून परत देण्यात येतील. सदरची कारवाई ही आता सुरूच राहणार असून पनवेलमध्ये मीटरप्रमाणे रिक्षा चालवल्या जाव्यात यासाठी प्रशासनाचा प्रयत्न असणार आहे.

दिलीप दराडे, पनवेल परिवहन अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news