Raj Thackeray Eknath Shinde Meeting: राज ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट

पालिका निवडणुकीतील संघर्षानंतर पहिल्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Raj Thackeray Eknath Shinde Meeting
Raj Thackeray Eknath Shinde MeetingPudhari
Published on
Updated on

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या ‌‘नंदनवन‌’ या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. पालिका निवडणुकांच्या प्रचारात एकमेकांविरोधात हल्लाबोल करणाऱ्या या दोन्ही नेत्यांच्या या भेटीने राजकीय चर्चांना सुरुवात झाली आहे.

Raj Thackeray Eknath Shinde Meeting
Rajya Sabha Election Maharashtra: मविआसमोर सहमतीच्या उमेदवाराचे मोठे आव्हान

राज ठाकरे बुधवारी दुपारी अचानक एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी दाखल झाले. यावेळी शिंदेंनी राज ठाकरेंचा सत्कार केला. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. महापालिका निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये राज ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकेची झोड उठविली होती. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेला त्यांनी लक्ष्य केले होते. शिवाय,

Raj Thackeray Eknath Shinde Meeting
BMC Standing Committee Chairman | स्थायी समिती अध्यक्षपदी प्रभाकर शिंदे यांच्या नावाची घोषणा

दोन्ही ठाकरे बंधूंच्या युतीसाठी राज यांनी महायुती आणि त्यातही एकनाथ शिंदेंच्या गाठीभेटी बंद कराव्यात, असा सूर ठाकरे गटाकडून आळविला गेला होता. मात्र, आता पालिका निवडणुका सरल्यानंतर आणि त्या निवडणुकांच्या निकालानंतर राजकीय समीकरणे बदलू लागली आहेत. ठाकरे-शिंदे भेटीमुळे काही नवी राजकीय रणनीती आकाराला येणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news