Maharashtra Technical Schools Renaming: सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलली, पाहा पूर्ण यादी

Maharashtra Technical Schools Renaming: राज्यातील उर्वरित ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Maharashtra Technical Schools Renaming
Maharashtra Technical Schools RenamingPudhari
Published on: 
Updated on: 

Maharashtra Technical Schools Renaming: राज्यातील ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, आता या विद्यालयांना स्थानिक स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिवीर आणि महापुरुषांची नावे दिली जाणार आहेत. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान केला जाणार आहे.

राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येत आहे. यापूर्वी कोकण आणि नाशिक विभागातील २५ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याबाबत २१ ऑक्टोबर २०२६ रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानंतर या दोन विभागांव्यतिरिक्त राज्यातील इतर विभागांमधील उर्वरित ५१ शासकीय तांत्रिक विद्यालयांची नावे बदलण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता. आता या विद्यालयांच्या नामांतराचा निर्णय घेण्यात आला आहे.

Maharashtra Technical Schools Renaming
Radhika Apte: त्या रात्री गोव्यात नेमकं काय घडलं होतं? तुषार कपूरला डेट केल्याच्या चर्चांवर राधिकाचे भन्नाट उत्तर

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, शासकीय तांत्रिक विद्यालयांच्या नामांतराचा निर्णय घेण्यासाठी कौशल्य विकास मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला विद्यालयांची नावे बदलण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

Maharashtra Technical Schools Renaming
Gold Silver Price Today: सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालथ! सण संपताच दर कोसळले, आता आणखी स्वस्त होणार का?

या निर्णयातील विशेष बाब म्हणजे, प्रत्येक विद्यालयाला त्या परिसराशी संबंधित ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे नाव देण्यावर भर देण्यात आला आहे. पुण्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयाला हिरोजी इंदुलकर यांचे नाव दिले जाणार आहे. तर साताऱ्यातील विद्यालयाला स्वातंत्र्यसेनानी रंगो बापूजी गुप्ते यांचे नाव देण्यात आले आहे.

स्थानिक इतिहास, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि महाराष्ट्राच्या सामाजिक-सांस्कृतिक वारशाची ओळख नव्या पिढीला व्हावी, हा या निर्णयामागील महत्त्वाचा उद्देश आहे. तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अशा महान व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची प्रेरणा मिळावी, अशी अपेक्षाही या निर्णयातून व्यक्त होत आहे. तसेच राज्यातील शासकीय तांत्रिक विद्यालयांना नवी ओळख मिळणार असून, या माध्यमातून महाराष्ट्राच्या इतिहासातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्वांचा गौरव केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.