Private Coaching Classes: कोचिंग क्लासेसवरील कठोर अटी मागे घ्या! राज्यातील क्लासचालकांची मागणी

या अटी शिथिल केल्यास शासनाला सहकार्य करण्याची तयारी असल्याचे राज्य प्रवक्ते बंडोपंत भुयार यांनी म्हटले आहे.
Coaching Class
Coaching Class Pudhari
Published on
Updated on

मुंबई: खासगी कोचिंग क्लासेससाठी शासनाने प्रस्तावित केलेल्या नियमावलीतील कठोर अटी शिथिल कराव्यात, अशी मागणी राज्यातील कोचिंग क्लासेस चालकांच्या संघटनांनी केली आहे.

या नियमावलीच्या मसुद्यावर सूचना व हरकती मागविण्यात आल्या असून, त्यात क्लासचालकांना अडचणीच्या ठरणाऱ्या अनेक तरतुदी असल्याचा दावा संघटनेने केला आहे. या अटी शिथिल केल्यास शासनाला सहकार्य करण्याची तयारी असल्याचे राज्य प्रवक्ते बंडोपंत भुयार यांनी म्हटले आहे.

Coaching Class
Teacher Recruitment Age Limit: खासगी शाळांतील शिक्षक भरतीसाठी वयोमर्यादा नाही; इच्छुकांना दिलासा

राज्यातील कोचिंग क्लासेसचे आकारमान आणि विद्यार्थ्यांची संख्या वेगवेगळी असल्याने सर्व क्लासेसना सरसकट समान नियम लागू करू नयेत. लहान, मध्यम आणि मोठे क्लासेस असे वर्गीकरण करून त्यानुसार नियम निश्चित करावेत, अशी मागणी करण्यात आली.

शंभरपेक्षा अधिक विद्यार्थी असलेल्या क्लासेससाठीच नोंदणीची अट ठेवावी तसेच नोंदणी वारंवार करण्याऐवजी एकदाच करण्याची सुविधा द्यावी, असेही संघटनेने म्हटले आहे.

क्लासमध्ये विद्यार्थ्यांसाठी आवश्यक जागेची अटही शिथिल करण्याची मागणी करण्यात आली आहे. सध्याच्या प्रस्तावित प्रमाणाऐवजी प्रतिविद्यार्थी कमी जागेची अट ठेवावी. तसेच अनुभवी शिक्षकांना पदवीची सक्ती करू नये, अशी भूमिका संघटनेने मांडली.

विद्यार्थ्यांनी क्लास सोडल्यानंतर उर्वरित कालावधीची फी आकारू नये आणि फीविषयक नियम व्यवहार्य ठेवावेत, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Coaching Class
BMC Free School Uniform: ऑगस्ट संपला; विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, वह्या मिळेना! पालिकेचा ५२ कोटींचा निधी मंजूर

दंडाआधी सूचना द्या

नियमांचे उल्लंघन झाल्यास थेट मोठा दंड करण्याऐवजी प्रथम सूचना देण्यात यावी. त्यानंतरही नियमभंग झाल्यास टप्प्याटप्प्याने दंडाची तरतूद करावी, अशी मागणी करण्यात आली. क्लासेसची तपासणी करण्यापूर्वी संबंधित संचालकांना पूर्वकल्पना द्यावी, अशी सूचनाही संघटनेने केली आहे.

प्रत्येक क्लासमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी रॅम्पसह सर्व सुविधा उपलब्ध करून देणे व्यवहार्य नसल्याचे संघटनेने म्हटले आहे. ज्या क्लासमध्ये अशा विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध आहेत, तेथे त्यांनी प्रवेश घेण्याची मुभा असावी, मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांच्या भेटीबाबत नियम व्यवहार्य करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नोंदणीकृत कोचिंग क्लासेसच्या संचालकांना शिक्षक मतदारसंघात मतदानाचा अधिकार द्यावा. तसेच अनुभवी व पात्र शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात यावा आणि अनुभवी क्लासचालकांना राज्य अभ्यास मंडळाच्या सदस्यपदी संधी द्यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news