

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी महाराष्ट्रात मान्सून लवकर दाखल झाल्याने सुरुवातीला मुंबई व कोकणात थोड्या प्रमाणात पाऊस झाला. मात्र, नंतर हवामान कोरडं आणि दमट बनलं होतं. आता पुन्हा एकदा हवामान खात्यानं येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
विशेषतः कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात 13 जूनपासून (गुरुवार) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुढील ५ दिवस महाराष्ट्रात पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागानुसार, मुंबईत मान्सूनने उंबरा ओलांडल्यानंतरही पाऊस फारसा झाला नाही. मात्र, हवामानात लवकरच बदल होऊन 30 जूनपर्यंत पावसाचे प्रमाण झपाट्याने वाढेल, असा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पहिल्या आठवड्यातच दमदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुढील दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात मध्य भारतातही चांगला पाऊस होईल, असं भाकीत मॉडेल्स सूचित करत आहेत. जिल्हानिहाय ऑरेंज अलर्ट व पावसाचा अंदाज पावसाच्या या अंदाजानुसार हवामान विभागानं खालील जिल्ह्यांमध्ये
(13 जून): अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूर शुक्रवार
(14 जून): रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली शनिवार
(15 जून): रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग रविवार
(16 जून): रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग काही भागांत पूरजन्य परिस्थितीची शक्यता हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितलं की, देशात सध्या मान्सूनमध्ये सरासरीच्या तुलनेत ३२ टक्के कमी पाऊस झाला आहे.
मात्र, जून महिन्याच्या अखेरीस १०८ टक्के सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्यामुळे, काही भागांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.