Menstrual Leave: मासिक पाळीत सुट्टीबाबत विधी खात्याचा सल्ला; गर्भलिंग निदान रोखण्यासाठी कायदे कठोर करण्याचा विचार

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची विधानसभेत माहिती; बेकायदा तपासणीची माहिती देणाऱ्यास 1 लाखांचे बक्षीस
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरPudhari
Published on
Updated on

मुंबई : मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देता येईल काय, यासाठी विधी आणि न्याय विभागाकडून सल्ला मागविला जाईल, असे स्पष्ट करतानाच प्रसूतीपूर्व लिंगनिदान रोखण्यासाठी या कायद्यातील कलमे अधिक कठोर करण्याचा विचार करू, अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
BMC Budget Growth: 10 वर्षांत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 40 हजार कोटींनी वाढला

मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्यात यावी आणि स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्यांना ‌‘मोका‌’ लावण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार हेमंत ओगले, भाजपच्या नमिता मुंदडा, काँग्रेसच्या ज्योती गायकवाड यांनीही मासिक पाळीच्या काळात महिलांना सुट्टी देण्याची मागणी केली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
BMC Budget 2026-27: मुंबईकरांवर नवा कर नाही; 80,952 कोटींचा महापालिका अर्थसंकल्प ठेवी मोडून विकासाला चालना

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवर मोबाईल व्हॅनमधून पोर्टेबल मशिनच्या माध्यमातून टेस्ट केली जाते. सीमावर्ती गावांत प्रसूतीपूर्वी गर्भलिंग निदान चाचणी करून नंतर स्त्रीभ्रूण हत्या केली जात असल्याचा मुद्दा बाबासाहेब देशमुख यांनी मांडला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनी, अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतल्यास प्रश्न सुटतील, अशी सूचना केली.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
DA Hike | राज्य सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ

खबरीला 1 लाखाचे बक्षीस देणार

बेकायदा गर्भलिंग तपासणी करणाऱ्या केंद्रांची माहिती देण्यासाठी खबरीला 1 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे. अशी माहिती मंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले. तसेच, राज्यात दर हजारी स्त्री-पुरुष गुणोत्तरात काही जिल्ह्यांमध्ये चांगल्या प्रकारे वाढ होत आहे. यात लातूर जिल्हा पुढे असून, तिथे स्त्री-पुरुष गुणोत्तर 1,265 इतके आहे. वर्धा 1,173, धाराशिव 1,050, गडचिरोली 1,093 आणि गोंदिया येथे 1,050 इतके गुणोत्तर असल्याचे त्यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news