BMC Budget Growth: 10 वर्षांत मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 40 हजार कोटींनी वाढला

2017-18 मधील 20 हजार कोटींपासून 2026-27 मध्ये 80,952 कोटींपर्यंत झेप; ठेवी घटण्याची शक्यता
BMC Budget
BMC BudgetPudhari
Published on
Updated on

मुंबई महानगरपालिकेच्यो अर्थसंकल्पाचे आकारमान गेल्या दहा वर्षात तब्बल 40 हजार 800 कोटी रुपयांनी वाढले आहे. 2017-18 या आर्थिक वर्षामध्ये अर्थसंकल्पाचे आकारमान 20 हजार 36 कोटी इतके होते. यात दरवर्षी वाढ होत अर्थसंकल्पाचे आकारमान 2026-27 मध्ये 80 हजार 952 कोटी रुपये इतके झाले आहे.

BMC Budget
BMC Budget 2026-27: मुंबईकरांवर नवा कर नाही; 80,952 कोटींचा महापालिका अर्थसंकल्प ठेवी मोडून विकासाला चालना

असा वाढत गेला अर्थसंकल्प

17-18 - 20 हजार 36 कोटी 64 लाख

18-19 - 20 हजार 643 कोटी 91 लाख

19-20 - 26 हजार 406 कोटी 46 लाख

20-21 - 29 हजार 373 कोटी 46 लाख

21-22 - 35 हजार 962 कोटी 9 लाख

22-23 - 38 हजार 515 कोटी 49 लाख

23-24 - 46 हजार 7 कोटी 70 लाख

24-25 - 64 हजार 167 कोटी 33 लाख

25-26 - 74 हजार 366 कोटी 76 लाख

26-27 - 80 हजार 952 कोटी 64 लाख

BMC Budget
kidney sale case | किडनी विक्री प्रकरणातील सहा सावकारांची संपत्ती गोठविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

ठेवी आणखी घटणार

पालिकेच्या विविध बँकांमध्ये सुमारे 82 हजार कोटींच्या मुदतठेवी आहेत. त्यातून महापालिका 36 हजार 623 कोटी रुपये काढू शकते. मात्र या अर्थसंकल्पाने तूर्त 14 हजार 295 कोटी रुपयांच्या मुदतठेवी मोडण्याचे ठरवले आहे. हे प्रमाण गरजेनुसार वाढू देखील शकते. वर्षभरात मुदतठेवी मोडण्यात येणार असल्यामुळे मुदत ठेवीचा आकडा 70 हजार कोटी रुपयांपर्यंत किंवा त्याहीखाली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news