MBBS BDS Admission: एमबीबीएसला पसंती, बीडीएसला मात्र प्रतीक्षा; पहिल्या फेरीत ८,००१ जागांवर प्रवेश

बीडीएसच्या १,३९२ जागा रिक्त
Admission
AdmissionPudhari
Published on
Updated on

मुंबई: बारावीनंतर वैद्यकीय शिक्षणाची वाट निवडलेल्या विद्यार्थ्यांनी एमबीबीएसला स्पष्ट पसंती दिल्याचे राज्यातील पहिल्या प्रवेश फेरीच्या निकालातून दिसून आले आहे. एमबीबीएसच्या ८ हजार १२९ जागांपैकी तब्बल ६ हजार ८७६ जागांवर प्रवेश झाले असून, बीडीएसच्या २ हजार ५१७ जागांपैकी केवळ १ हजार १२५ जागांवर प्रवेश निश्चित झाले आहेत.

दोन्ही अभ्यासक्रमांच्या मिळून १० हजार ६४६ जागांपैकी ८ हजार १ जागांवर प्रवेश झाले असून, २ हजार ६४५ जागा दुसऱ्या फेरीसाठी रिक्त राहिल्या आहेत.

Admission
MBA Student Blackmail Case: मालाडमध्ये MBA विद्यार्थ्याला ब्लॅकमेल; परीक्षेच्या गैरप्रकाराची भीती दाखवून २४ लाखांची खंडणी

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी एमबीबीएस आणि बीडीएस अभ्यासक्रमांच्या राज्य कोट्यातील केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली.

या फेरीत प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांपैकी १ हजार ३१७ विद्यार्थ्यांनी मिळालेली जागा ‘फ्रीज’ केली असून, ६ हजार ६८४ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या ४ हजार ९८० जागांपैकी ४ हजार ६६५ जागांवर प्रवेश झाले. त्यामुळे या जागांपैकी ९३.६७ टक्के जागा पहिल्याच फेरीत भरल्या असून, केवळ ४१५ जागा रिक्त राहिल्या आहेत. यापैकी ८८८ विद्यार्थ्यांनी प्रवेशाची जागा ‘फ्रीज’ केली, तर ३ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला.

खासगी वैद्यकीय महाविद्यालयांतील एमबीबीएसच्या ३ हजार १४९ जागांपैकी २ हजार ३११ जागांवर प्रवेश झाले आहेत. या जागांपैकी ७३.३८ टक्के जागा भरल्या असून, ८३८ जागा रिक्त आहेत.

Admission
Subhash Chandra CBI Case: सुभाष चंद्रांशी संबंधित कंपन्यांविरोधात गुन्हा; एलआयसी हाउसिंग घोटाळ्यात सीबीआयची कारवाई

यापैकी २४९ विद्यार्थ्यांनी जागा ‘फ्रीज’ केली, तर २ हजार ६२ विद्यार्थ्यांनी ‘बेटरमेंट’चा पर्याय निवडला. तर बीडीएसच्या प्रवेशामध्ये जागा रिकामी राहिल्या आहेत. २ हजार ५१७ जागांपैकी १ हजार १२५ जागांवर प्रवेश झाले असून, १ हजार ३९२ जागा रिक्त आहेत.

शासकीय महाविद्यालयांतील ३१७ जागांपैकी १९६ जागा भरल्या असून, १२१ जागा रिक्त राहिल्या आहेत. तर खासगी महाविद्यालयांतील २ हजार २०० जागांपैकी केवळ ९२९ जागांवर प्रवेश झाले असून, तब्बल १ हजार २७१ जागा रिक्त आहेत.

पहिल्या फेरीनंतर आता रिक्त राहिलेल्या जागांसाठी आता दुसरी केंद्रीभूत प्रवेश फेरी होणार आहे. या फेरीसाठी उपलब्ध जागांचा तपशील ७ सप्टेंबरला जाहीर केला जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news