Air Ambulance on Highways: महामार्गांवर हवाई रुग्णवाहिका; राज्य सरकारचे नवीन वर्षात मोठे नियोजन

नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने केले आहे.
Air Ambulance on Highways
Air Ambulance on Highwayspudhari
Published on: 
Updated on: 

Air Ambulance on Highways Maharashtra: नवीन वर्षाच्या सुरुवातीला महामार्गांवर हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचे नियोजन महाराष्ट्र सरकारने केले आहे. गंभीर अपघातांतील जखमींना तातडीने उपचार मिळावेत, यासाठी राज्य सरकार हा पुढाकार घेणार आहे. अपघातानंतरच्या पहिल्या तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’मध्ये जखमींना उपचार मिळण्यावर भर देण्यासाठी एअर ॲम्ब्युलन्स उपयोगी पडते.

Air Ambulance on Highways
Nashik Mumbai Highway | नवीन कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनर दुचाकीवर पलटी झाल्याने पती-पत्नी जागीच ठार

राज्य सरकारने समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर विशेष यंत्रणा उभारण्याचे नियोजन केले आहे. हवाई रुग्णवाहिकेद्वारे जखमींना ट्रॉमा केअर सेंटरपर्यंत जलद पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

Air Ambulance on Highways
Manmad Pune Indore Highway | मनमाडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने चिरडल्याने 19 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू, 8 वर्षांचा भाऊ गंभीर

१५ नोव्हेंबरपर्यंत याबाबतची कार्यपद्धती (SOP) तयार करून मंजुरी घेण्याचा प्रयत्न संबंधित विभाग करणार आहे. नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला सेवा सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकारने आखले आहे.

Air Ambulance on Highways
Mumbai Goa Highway Accident: मुंबई-गोवा महामार्गावर इर्टिगा कारचा भीषण अपघात; एक ठार, दोन गंभीर जखमी

परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभागांच्या समन्वयातून आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा उभारण्यात येणार आहे. ट्रॉमा केअर सेंटरचे जाळे, सेवा पुरवठादारांचे पॅनेल आणि रस्ता सुरक्षा निधीतून आर्थिक तरतूद करण्यावर भर देण्यात येणार आहे. राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती आहे. अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळावेत आणि उपचारांतील विलंबामुळे जीवितहानी होऊ नये, यासाठी शासनाचे प्रयत्नशील आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news