Manmad Pune Indore Highway | मनमाडमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने चिरडल्याने 19 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू, 8 वर्षांचा भाऊ गंभीर

Manmad Pune Indore Highway | पुणे-इंदूर महामार्गावर अपघात; युवतीचा मृत्यू, बालक गंभीर
Accident
AccidentPudhari
Published on: 
Updated on: 

मनमाड : पुढारी वृत्तसेवा

भरधाव ट्रकखाली सापडून १९ वर्षीय युवतीचा जागीच मृत्यू झाला. तिच्यासोबत असलेले ८ वर्षीय बालक गंभीर जखमी झाल्याची हृदयद्रावक घटना शहरातून जाणाऱ्या पुणे - इंदूर महामार्गावर घडली. पोलिसांनी या प्रकरणी ट्रकचालकाला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाने महामार्गावरील वाहतूक कोंडी व अपघात टाळण्यासाठी चार महिन्यांपूर्वीच महामार्गालगतची सर्व अतिक्रमणे काढली, तरीही महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच आहे.

Accident
Manmad Marigold Flower Farming | दसरा-दिवाळीपूर्वीच बळीराजा संकटात! पावसाच्या दडीमुळे मनमाड परिसरात झेंडूची शेती करपली

मृत युवतीचे नाव कोमल संतोष पगारे (१९, रा. शिंगवे, ता. चांदवड) आहे. ती तिच्या आठवर्षीय भावासोबत कामानिमित्त मनमाडला आली होती. दोघे रस्त्याने पायी जाताना मागून ट्रक (यूपी - २५, एफटी - २२४९) ने दोघांना धडक दिली. धडक इतकी जबर होती की, कोमलचा जागीच मृत्यू झाला, तर बालक गंभीर जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी बालकाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news