Nashik Mumbai Highway | नवीन कसारा घाटात भीषण अपघात; कंटेनर दुचाकीवर पलटी झाल्याने पती-पत्नी जागीच ठार

Nashik Mumbai Highway | नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात कंटेनर उल्टा होऊन त्याखाली दबल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.
Road Accident Death
Road Accident Death pudhari photo
Published on: 
Updated on: 

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा

नाशिक-मुंबई महामार्गावरील नवीन कसारा घाटात कंटेनर उल्टा होऊन त्याखाली दबल्याने दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे कंटेनरखाली दुचाकीसह दाम्पत्य असल्याची माहिती कोणालाही नव्हती. अपघातग्रस्त कंटेनर बाजूला करताना ही घटना लक्षात आली.

Road Accident Death
Nashik Heavy Rain Alert | पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांना झोडपले

शुक्रवारी (दि. ९) सकाळी नाशिकहून मुंबईकडे निघालेला कंटेनर (एन. एल. १ एन. ०६८८) हा भरधाव वेगात जात असताना अकराच्या सुमारास नवीन कसारा घाटात नागमोडी वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर जागीच पलटी झाला. यावेळी बाजूने जात दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्य त्याखाली दबले गेले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी शनिवारी अपघातग्रस्त कंटेनर काढण्याचे काम सुरू असताना आपत्ती व्यवस्थापन टीमचे सदस्य लक्ष्मण वाघ, जसविंदर सिंग, दत्ता वा्ताडे, बाळू यांनी क्रेनच्या साहाय्याने कंटेनर बाजूला केला असता त्यांना श्याम धुमाळ यांच्या हा प्रकार लक्षात आला. याबाबत तत्काळ कसारा पोलिसांना माहिती कळवण्यात आली. মরদেহ बाहेर काढून कसारा आरोग्य केंद्रात आणण्यात आले.

Road Accident Death
Nashik Heavy Rain Alert | पेठ, सुरगाणा, कळवण, बागलाण, नांदगाव, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी तालुक्यांना झोडपले

तपासात जालिंदर भगत व अनुसूया भगत असे (रा. घोटी) असे या दाम्पत्याची ओळख निष्पन्न झाली. वर्षश्रद्धा कार्यक्रमासाठी हे दाम्पत्य शुक्रवारी सकाळी घोटीहून कसारा येथे जाण्यासाठी निघालेले होते. भगत दाम्पत्य कसारा येथे कार्यक्रमात पोहोचले नसल्याने घरच्या लोकांनी रात्री शोधाशोध सुरू केली.

परंतु त्यांचे लोकेशन लागत नव्हते. जेव्हा ही बातमी कळली तेव्हा नातेवाईकांनी कसारा घाटात धाव घेतली. या प्रकरणी कसारा ठाण्याचे प्रभारी निखिल लसने, सहायक पोलीस निरीक्षक राकेश कदम, हवालदार उमेश चौधरी, देवेंद्र शिरसाठ अधिक तपास करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news