FDA Vacant Posts: एफडीएच्या धाडी वाढल्या, मात्र अपुरे मनुष्यबळ; २१३ पदे रिक्त

पुणे, नाशिक येथील प्रयोगशाळांचे काम सुरू, सध्याच्या प्रयोगशाळांची क्षमता सरासरी दोन हजार नमुने तपासण्याची
FDA Vacant Posts
FDA Vacant PostsPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: राज्यात अन्न आणि औषधांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून तपासणी मोहिमा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्या आहेत. मात्र रिक्त पदांचे प्रमाणही बर्‍यापैकी आहे.

अन्न आणि औषध विभागात एकूण २१३ पदे रिक्त आहेत. त्याचवेळी प्रयोगशाळाही अपुर्‍या पडत आहेत. सध्या राज्यात अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर अशा तीन शासकीय प्रयोगशाळा कार्यरत आहेत. त्‍यात पुणे आणि नाशिक येथील आणखी दोन प्रयोगशाळांची भर पडणार आहे. त्‍याचे काम सुरू झाले आहे.

FDA Vacant Posts
Satish Waghole MPSC Chairman: एमपीएससी अध्यक्षपदाचा कार्यभार वाघोलेंकडे; राज्यपालांकडून आदेश जारी

अन्न विभागात ५८ पदे रिक्त

अन्न विभागातील अन्न सुरक्षा अधिकारी, सहायक आयुक्त आणि संयुक्त आयुक्त या पदांची एकूण ४४८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ३९० पदांवर अधिकारी कार्यरत असून ५८ पदे रिक्त आहेत.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची ३५० पदे मंजूर असून ३१५ कार्यरत आणि ३५ पदे रिक्त आहेत. सहायक आयुक्त (अन्न) यांची ९० पदे मंजूर असून ७४ कार्यरत, तर १६ रिक्त आहेत. संयुक्त आयुक्त (अन्न) यांच्या आठ मंजूर पदांपैकी केवळ एक पद कार्यरत असून सात पदे रिक्त आहेत.

FDA Vacant Posts
Devendra Fadnavis: ‘मी तुझ्या पाठीशी आहे’; राम पूर्णेकरांना मुख्यमंत्र्यांचा धीर, न्यायाचे आश्वासन

औषध निरीक्षकांची १५५ पदे रिक्त

औषध विभागातही मनुष्यबळाचा प्रश्न कायम आहे. २०० औषध निरीक्षकांची पदे मंजूर असून केवळ ४५ पदे कार्यरत आहेत. तब्बल १५५ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांपैकी १५४ पदांच्या भरतीची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती एप्रिल २०२६ मध्ये देण्यात आली होती.

तीन प्रयोगशाळांची वार्षिक क्षमता १२ हजार नमुने

राज्यातील तीन कार्यरत शासकीय प्रयोगशाळांची अधिकृत वार्षिक क्षमता अन्न आणि औषधांसाठी स्वतंत्र आहे. मुंबई प्रयोगशाळेत दरवर्षी २,५०० अन्न आणि २,७०० औषध नमुने तपासण्याची क्षमता आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्नाचे २,००० आणि औषधांचे २,२००, तर नागपूरमध्ये अन्नाचे १,७०० आणि औषधांचे ५०० नमुने तपासण्याची क्षमता आहे. यामुळे तीनही प्रयोगशाळांची एकत्रित वार्षिक क्षमता अन्नासाठी ६,२००, तर औषधांसाठी ५,४००, अशी एकूण ११,६०० नमुने आहे.

तीन महिन्यांत ३४ हजार अन्न नमुने

दरम्यान, जून ते ऑगस्ट २०२६ या तीन महिन्यांत राज्यात तब्बल ३४,५८४ अन्न नमुने संकलित करण्यात आले. त्यापैकी ३०,४९२ नमुन्यांची तपासणी पूर्ण झाली. याच कालावधीत औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे ३,०२० नमुने संकलित करून २,११२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. विशेष तपासणी मोहिमांमध्ये राज्यातील उपलब्ध प्रयोगशाळांबरोबरच इतर शासकीय प्रयोगशाळांचीही मदत घेतली जात असल्याचे प्रशासनाच्या माहितीतून दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news