Devendra Fadnavis: ‘मी तुझ्या पाठीशी आहे’; राम पूर्णेकरांना मुख्यमंत्र्यांचा धीर, न्यायाचे आश्वासन

devendra fadnavis meets ram purnekar: प्रदीप पूर्णेकर प्रकरणाच्या तपासाला गती देण्याची मागणी; मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांनी पुन्हा भेटीस बोलावले
Devendra Fadnavis
Devendra FadnavisPudhari
Published on: 
Updated on: 

ठाणे: वडील प्रदीप पूर्णेकर यांच्या राजकीय हत्येने हादरून गेलेले त्यांचे चिरंजीव राम पूर्णेकर यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आपल्या ठाणे भेटीत मोठा धीर दिला आणि सांगितले की, तुझ्या वडिलांवर अन्याय होऊ देणार नाही, मी तुझ्या पाठीशी आहे.

ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाच्या तपासाला गती मिळावी आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा, यासाठी पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गाठले.

Devendra Fadnavis
Thane Crime : ठाणे हादरले! वाढदिवसाचा खर्च आणि बाईकचा हव्यास; गळ्यातील सोन्याच्या साखळीसाठी दहावीतील मित्राचीच हत्या

देवी दर्शनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री ठाण्यात आले असता आमदार संजय केळकर आणि ठाण्याचे उपमहापौर कृष्णा पाटील यांच्या माध्यमातून हायलँड पार्क येथे ही भेट झाली. राम पूर्णेकरांना आश्वस्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी त्यांना पुन्हा दोन दिवसांनी भेटायला देखील बोलावले.

Devendra Fadnavis
MBMC Meeting Conflict | मिरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेतील राड्याचे वृत्तांकन करणाऱ्या पत्रकारांना भाजप नगरसेवकांकडून मारहाण

प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या हत्या प्रकरणात यापूर्वीच पाचही मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची दोन दिवस चौकशी करण्यात आली असून, मीनाक्षी शिंदे यांनाही चौकशीला सामोेरे जावे लागण्याची शक्यता आहे. पुरवणी एफआयआरमध्ये हे दोघे आरोपी आहेत.

या प्रकरणी भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून राम पूर्णेकरांची थेट मुख्यमंत्र्यांशीच भेट झाल्याने ठाण्यातील भाजपच्या नेत्यांनीही हे प्रकरण लावून धरले आहे असे दिसते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news