FDA Food Safety Action: सणासुदीत अन्नपदार्थांवर FDA ची नजर! ३७.८६ टन साठा जप्त; १७ आस्थापनांवर कारवाई

सणासुदीत FDA ने राज्यभर कारवाई करत ९४.९० लाख रुपयांचा ३७.८६ टन अन्नसाठा जप्त केला; १७ आस्थापनांवर कारवाई.
FDA Food Safety Action
FDA Food Safety ActionPudhari
Published on: 
Updated on: 

मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) राज्यभरात धडक कारवाई करत सुमारे ३७.८६ टन अन्नसाठा जप्त केला आहे. या साठ्याची किंमत सुमारे ९४ लाख ९० हजार रुपये आहे. अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी १७ आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी प्रमाणपत्रे निलंबित करण्यात आली आहेत.

२३ ते २७ सप्टेंबरदरम्यान करण्यात आलेल्या या कारवाईत कोकण, पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, जळगाव व अकोला विभागांत कारवाई करण्यात आली.

FDA Food Safety Action
Panvel Municipal Corporation: पनवेल महापालिकेच्या दशकपूर्तीवर खर्चाला ब्रेक! दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कार्यक्रमात मोठी कपात

अन्नपदार्थांची अयोग्य साठवणूक, मुदतबाह्य किंवा संशयित दर्जाचे पदार्थ, स्वच्छतेचा अभाव, चुकीचे लेबलिंग आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन यावर एफडीएने कारवाई केली.

कोकण विभागात २३ हजार ८०६.९० किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ३९.९९ लाख रुपये आहे. पुणे विभागात ६ हजार ३६६.८८ किलो साठा जप्त करून सुमारे २८.५४ लाख रुपयांची कारवाई करण्यात आली. जळगावमध्ये ७ हजार ७४९.९ किलो साठा जप्त करण्यात आला असून त्याची किंमत ४.२८ लाख रुपये आहे.

नागपूर विभागात अन्नसाठा जप्त व नष्ट करण्याची कारवाई ३२.७४ लाख रुपयांची झाली. यात स्टार अ‍ॅनिसला कृत्रिम रंग, मनुका, खाद्यतेल, तांदूळ, पेये, गूळ, क्रीम, बेसन यांसह विविध पदार्थांचा समावेश आहे. अकोल्यात अहमदाबादहून संशयास्पदरीत्या वाहतूक करण्यात आलेल्या १ हजार ०९७ किलो मिठाईचा २.९४ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला.

FDA Food Safety Action
Palghar Road Accident: खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात कंटेनरखाली चिरडून वृद्धाचा मृत्यू

अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधातील कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी संशयित, मुदतबाह्य किंवा अस्वच्छ अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास प्रशासनाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिबंधित पदार्थांवरही धडक

प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या विक्रीविरोधात राज्यात २६ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे ३०.६३ लाख रुपयांचा साठा जप्त, २२ गुन्हे दाखल आणि ३० जणांना अटक करण्यात आली. तीन आस्थापने सील करण्यात आली असून तीन वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. जप्त वाहनांची किंमत सुमारे १४.८ लाख रुपये आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news