Farmer Loan Waiver
Farmer Loan Waiver

Maharashtra Farmer Loan Waiver: शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारची हालचाल; अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना’साठी ५,९७५ कोटींची मागणी; ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफीचे आश्वासन
Published on

मुंबई : दिलीप सपाटे

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5 हजार 975 कोटी 51 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली आहे.

 Farmer Loan Waiver
Marathi Medium Engineering: इंजिनिअरिंगसाठी मराठीची झेप; राज्यात ४२% विद्यार्थी तंत्रशिक्षण घेतायत मातृभाषेत

30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. सहकार मंत्र्यांनी दिलेली माहिती पाहता येणाऱ्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसाठी तरतूद होण्याचे संकेत आहेत.

 Farmer Loan Waiver
Ganesh Naik: लाडकी बहीण योजनेचा इतर खात्यांवर परिणाम; वनमंत्री गणेश नाईक यांची कबुली

शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस सरकाराला करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025 च्या शासन निर्णयन्वये उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे लेखी उत्तरात म्हटले आहे.

 Farmer Loan Waiver
Abhijat Marathi Book Exhibition Mumbai: ‘अभिजात’ मराठी पुस्तक प्रदर्शनात साहित्यसंपदेचा महोत्सव; शिवचरित्रांपासून पु.लंपर्यंत वाचकांची गर्दी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017 अंतर्गत कर्जमाफीस पात्र असलेल्या 50 लाख 60 हजार शेतकऱ्यांपैकी 44 लाख 4 हजार शेतकऱ्यांना योजेनचा लाभ देण्यात आला आहे. उर्वरित 6 लाख 56 हजार शेतकऱ्यांना लाभ देण्याची कार्यवाही सरू आहे. तर महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पात्र असलेल्या 32 लाख 42 हजार शेतकऱ्यांपैकी 32 लाख 29 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यात आल्याचे पाटील यांनी उत्तरात नमूद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news