Maharashtra Farmer Loan Waiver : साडेतीन लाख शेतकऱ्यांची कर्जमाफीची यादी प्रमाणित

यादीतील शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे देण्यास सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
farmer loan waiver
farmer loan waiverpudhari photo
Published on: 
Updated on: 

मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया थांबलेली नसून, पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे काम सुरू आहे. नव्याने आणखी साडेतीन लाख शेतकऱ्यांची यादी प्रमाणित करण्यात आली असून या यादीतील शेतकऱ्यांनाही लवकरच पैसे देण्यास सुरुवात होईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दुष्काळग्रस्त भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई वाढत असल्याने टँकरची संख्या वाढवण्यात येत आहे. मराठवाड्यातील बहुतांश भागांमध्ये निरीक्षण विहिरींमधील पाण्याची पातळी जमिनीपासून तीन मीटरपेक्षा खाली गेली आहे. अशा परिस्थितीत ऑक्टोबर-नोव्हेंबरपासूनच टँकर सुरू करावे लागतात. त्यामुळे आवश्यकतेनुसार टँकर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यांचा ‘जीपीएस’च्या मदतीने मागोवा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

farmer loan waiver
Pune University Protest Restrictions: पुणे विद्यापीठात सभा, मोर्चे आणि आंदोलनांवर निर्बंध; विद्यार्थी संघटनांचा तीव्र विरोध

पिण्यासाठी पाणी राखून ठेवता यावे, यासाठी पाणीपुरवठा व्यवस्थेतून पाणी घेतल्या जाणाऱ्या सुमारे १६ हजार अवैध जोडण्या तोडण्यात आल्या आहेत. यापुढेही कोणी अवैधरीत्या पाणी उपसा केल्यास त्याची जोडणी तोडण्यात येईल. हा निर्णय कठोर वाटू शकतो; मात्र दुष्काळी परिस्थितीत नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध ठेवणे आवश्यक असल्याने तो घेण्यात आल्याचे ते म्हणाले.

farmer loan waiver
Mumbai Restaurant Price Hike : मुंबईत रेस्टॉरंट्‌सच्या दरांत १०-१५% वाढ; खाणे-पिणे महागणार

सरसकट शैक्षणिक शुल्कमाफी लागू : मुख्‍यमंत्री

शैक्षणिक शुल्कमाफीसंदर्भात यापूर्वी काढलेल्या शासन निर्णयात १९९२ पासूनच्या काही अटींचा समावेश असल्याने सर्व पात्र लाभार्थ्यांना त्याचा फायदा मिळत नसल्याचे सरकारच्या निदर्शनास आले होते. मंत्रिमंडळाने या अटी काढून टाकण्याचा निर्णय घेतला असून शुल्कमाफीचा निर्णय आता सरसकट लागू करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सरकार हमीभावाने चारा खरेदी करणार

काही भागांमध्ये सुमारे ९० दिवस पुरेल इतकाच चारा उपलब्ध आहे, तर काही भागांत सहा ते सात महिन्यांचा साठा आहे. चाऱ्याची उपलब्धता वाढवण्यावर भर देण्यात येत आहे. धरण क्षेत्रांत पाणी उपलब्ध असलेल्या भागांमध्ये चारा पिकांची लागवड करावी, तसेच विहिरी किंवा अन्य जलस्रोतांमध्ये पाणी असलेल्या रब्बी हंगामात ज्वारी किंवा चारा पिके घ्यावीत, असे आवाहन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचा चारा राज्य सरकार हमीभावाने खरेदी करेल, अशा निर्णयाची प्रक्रिया सुरू आहे, असे मुख्‍यमंत्री म्‍हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news