Shetkari Karjmafi: कर्जमाफीसाठी अपूर्ण माहिती असलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर; नाव कसे तपासायचे? कागदपत्रे कुठे जमा करायची?

Farmer Loan Waiver Documents List: शासन स्तरावर प्रस्तावित असलेल्या 'शेतकरी कर्जनिवारण योजना २०२६' च्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे.
Shetkari Karjmafi
Shetkari Karjmafifile photo
Published on
Updated on

Shetkari Karjmafi 2026 Farmer Documents List

नागपूर : शासन स्तरावर प्रस्तावित असलेल्या 'शेतकरी कर्जनिवारण योजना २०२६' च्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र, अनेक थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण असल्याने ही प्रक्रिया पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. या पार्श्वभूमीवर, संबंधित शेतकऱ्यांनी आपली माहिती त्वरित बँकेत जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Shetkari Karjmafi
BMC Co-opted Corporator: २५ फेब्रुवारीला स्वीकृत नगरसेवकांची होणार घोषणा !

माहिती अभावी पोर्टलवर नोंदणी रखडली

सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांमार्फत थकबाकीदार शेतकऱ्यांची माहिती संकलित करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे:

  • आधार कार्ड क्रमांक

  • बचत खाते क्रमांक

  • मोबाईल नंबर

ही महत्त्वाची माहिती उपलब्ध नसल्यामुळे योजनेच्या अधिकृत पोर्टलवर त्यांची नावे नोंदवणे शक्य होत नाहीये. तसेच, अनेक कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत किंवा गाव सोडून स्थलांतरित झाले आहेत, ज्यामुळे त्यांच्या खात्यांची माहिती अद्ययावत करण्यात अडचणी येत आहेत.

याद्या कुठे उपलब्ध आहेत?

ज्या शेतकऱ्यांची माहिती अपूर्ण आहे, त्यांच्या नावाच्या याद्या खालील ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत:

  1. नजीकची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा.

  2. गावातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था.

  3. ग्रामपंचायत कार्यालय.

  4. पंचायत समिती व तहसील कार्यालय.

  5. सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था कार्यालय.

Shetkari Karjmafi
Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स आगीमुळे जळाला

मयत कर्जदारांच्या वारसांनाही आवाहन

विभागीय सहनिबंधकांनी स्पष्ट केले आहे की, जे कर्जदार शेतकरी मयत झाले आहेत, त्यांच्या वारसांनी बँकेच्या शाखेशी संपर्क साधून वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करावीत. जेणेकरून संबंधित कुटुंबाला योजनेचा लाभ मिळू शकेल.

"विभागातील एकही पात्र शेतकरी सभासद या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, हा आमचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किंवा त्यांच्या वारसांनी याद्यांमध्ये आपली नावे तपासावीत आणि तातडीने आवश्यक ती माहिती बँक किंवा सोसायटीकडे जमा करावी."

प्रवीण वानखेडे, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नागपूर.

शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्त पत्रामध्ये जाहिरात देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांनी त्यांची माहिती बँकेत सादर करण्यासाठी वृत्त पत्रामध्ये जाहिरात देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news