Ajit Pawar Plane Crash : अजितदादांच्या विमानातील ब्लॅकबॉक्स आगीमुळे जळाला

अपघातग्रस्त विमानाची सखोल चौकशी सुरू
Ajit Pawar Plane Crash
Ajit Pawar Plane Crashfile photo
Published on
Updated on

नवी दिल्ली : उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या अपघातग्रस्त विमानातील ब्लॅकबॉक्सला आगीमुळे मोठी हानी पोहोचली असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान, लिअरजेट 45 या अपघातग्रस्त विमानाची माहिती घेण्याबरोबर सखोल चौकशीही सुरू करण्यात आली आहे. ही चौकशी अपघात व घटना तपास नियम, 2017 तसेच आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटनेच्या आंतरराष्ट्रीय मानकांनुसार केली जात असल्याचे सांगण्यात आले.

बारामती येथे 28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रवास करत असलेल्या खासगी विमानाला झालेल्या अपघातात विमानाला आग लागून आगीत विमानाच्या ब्लॅक बॉक्सला मोठी हानी पोहोचली असल्याची माहिती मंगळवारी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने दिल्यानंतर खळबळ उडाली असून या अपघाताविषयी शंका आणि आरोपही उपस्थित होऊ लागले आहेत.

ब्लॅक बॉक्समध्ये दोन घटक असतात. यातील एक डीएफडीआर तर दुसरा सीव्हीआर. यापैकी एका भागाची म्हणजे डीएफडीआरची माहिती मिळवण्यात यश आले आहे, तर दुसऱ्या भागातील माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात विमान अपघात तपास ब्युरोने (एएआयबी) दिलेल्या माहितीनुसार विमानात 2 स्वतंत्र फ्लाईट रेकॉर्डर बसविण्यात आले होते. अपघातादरम्यान दीर्घकाळ तीव्र आगीच्या झळा बसल्याने या दोन्ही उपकरणांचे मोठे नुकसान झाले. यातील डिजिटल फ्लाईट डेटा रेकॉर्डरची (डीएफडीआर) निर्मिती एल 3 हॅरिस टेक्नॉलॉजीस कंपनीने केली आहे. या रेकॉर्डरमधील माहिती एएआयबीच्या फ्लाईट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरीत्या डाऊनलोड करण्यात आली आहे. दुसरे म्हणजे कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरची (सीव्हीआर) निर्मिती हनिवेल कंपनीने केली आहे. या रेकॉर्डरची सखोल तांत्रिक तपासणी सुरू आहे. यातील माहिती पुनर्प्राप्तीसाठी संबंधित उपकरणाच्या उत्पादन देशाच्या अधिकृत प्रतिनिधीची मदत मागविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news