Engineering Admission: अभियांत्रिकी प्रवेशाला मुदतवाढ द्या; वंचित विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी

महाराष्ट्रातील अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ देऊन प्रवेशापासून वंचित विद्यार्थ्यांना आणखी एक संधी देण्याची मागणी शिवसेनेचे राज्य सचिव अ‍ॅड. वैभव थोरात यांनी केली आहे. स्पॉट राऊंडनंतरही प्रवेशाची संधी देण्याची मागणी करण्यात आली आहे.
Engineering Admission
Engineering AdmissionPudhari
Published on
Updated on

मुंबई: राज्यातील अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशप्रक्रियेला मुदतवाढ देऊन अद्याप प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे राज्य सचिव अ‍ॅड. वैभव थोरात यांनी विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे केली आहे.

राज्यातील अनेक विद्यार्थी अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी शेवटच्या फेरीपर्यंत प्रवेश मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. विशेषतः स्पॉट राऊंड अथवा त्यानंतरच्या प्रवेश फेरीत प्रवेश मिळेल, या अपेक्षेने अनेक विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेत सहभागी होत आहेत.

Engineering Admission
Chandrashekhar Bawankule: महसूलमंत्र्यांचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात; प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख

मात्र, आर्थिक अडचणी, कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी लागलेला वेळ, प्रवेशप्रक्रियेबाबत झालेला विलंब तसेच अन्य अपरिहार्य कारणांमुळे अनेक विद्यार्थी अद्याप प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. याचबरोबर राज्यातील अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये काही जागा रिक्त असल्याचे थोरात यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

Engineering Admission
Bombay High Court ED Case: एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही; उच्च न्यायालयाने ‘ईडी’ला फटकारले

प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी उपलब्ध झाल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यापक हिताचा विचार करून संबंधित विभागाकडे याबाबत सकारात्मक पाठपुरावा करावा, अशी विनंती अ‍ॅड. थोरात यांनी उपसभापती सचिन अहिर यांच्याकडे केली आहे. याबाबत सूचना अहिर यांनी सीईटी सेलला दिल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news