Chandrashekhar Bawankule: महसूलमंत्र्यांचा ‘आदर्श नोंदणी पॅटर्न’ आता देशभरात; प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतील उपक्रमाची केंद्राकडून दखल; देशभर अशी कार्यालये सुरू करण्याचे निर्देश
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankulePudhari
Published on
Updated on

मुंबई: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून अस्तित्वात आलेल्या मॉडेल नोंदणी कार्यालयांच्या उपयोगितेची दखल केंद्र सरकारने घेतली असून पुणे येथे सुरू झालेले मॉडेल नोंदणी कार्यालय आता देशभर सुरू करण्याचे निर्देश केंद्रीय ग्रामीण विकास व पंचायतराज मंत्रालयाच्या भूमी संसाधन विभागाने दिले आहेत.

केंद्रीय भू-संसाधन विभागाचे सचिव नरेंद्र भूषण यांनी अशी कार्यालये देशभर सुरू करण्यासाठी प्रत्येक कार्यालयासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आल्याचे सांगितले.

भूषण यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्तावित ‘केंद्रीय नोंदणी विधेयक, २०२६’संदर्भात सर्व राज्यांच्या नोंदणी महानिरीक्षकांची व्हिडीओ कॉन्फरन्‍सिंगद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला राज्याचे नोंदणी महानिरीक्षक तथा मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे व उपमहानिरीक्षक राजेंद्र मुठे उपस्थित होते.

Chandrashekhar Bawankule
Bombay High Court ED Case: एका फ्लॅटमुळे संपूर्ण इमारतीचा पुनर्विकास रोखू शकत नाही; उच्च न्यायालयाने ‘ईडी’ला फटकारले

या बैठकीत प्रस्तावित विधेयकातील तरतुदी, संभाव्य परिणाम आणि राज्यस्तरावरील सुधारणांबाबत सविस्तर चर्चा करून राज्यांचे अभिप्राय व सूचना जाणून घेण्यात आल्या.

बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली नोंदणी व मुद्रांक विभागाने महसूलवाढीसोबतच नागरिकांना अधिक सुलभ, पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा देण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण योजना यशस्वीपणे राबविल्‍या जात असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिल्यावर, सर्व राज्यांनी असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवावेत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

Chandrashekhar Bawankule
Mumbai FDA Action: मुंबईतील १० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित; उंदीर-झुरळांसह अस्वच्छता आढळली

महाराष्ट्राच्या नोंदणी व मुद्रांक विभागाने सुरू केलेल्या एक जिल्हा, एक नोंदणी, ई-प्रमाण, पासपोर्ट कार्यालयांच्या धर्तीवर उभारलेली आदर्श कार्यालये आणि ई-नोंदणी यासारख्या गतिमान उपक्रमांचे केंद्रीय सचिवांनी विशेष कौतुक केले.

आदर्श दुय्यम निबंधक कार्यालयाची रचना

  • पुणे येथील कोथरूड भागात महाराष्ट्रातील पहिले कार्यालय सुरू करण्यात आले आहे.

  • मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या सहा प्रमुख जिल्ह्यांमधील मुख्यालयांच्या ठिकाणी ३० नवीन आदर्श कार्यालये.

  • ‘स्लॉट बुकिंग’द्वारे अत्यंत जलद दस्त नोंदणी.

  • हाय-स्पीड स्कॅनिंगद्वारे त्वरित डिजिटल दस्त रेकॉर्ड.

  • एकाच दिवसात दस्त नोंदणी व पावती.

  • डिजिटल टोकन आणि स्क्रीनवर थेट डिस्प्ले.

  • सर्व नागरिकांना विनामूल्य हाय-स्पीड वाय-फाय सुविधा.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेला गती देत, नागरिकांच्या सोयीसाठी भविष्यातही अधिक लोकाभिमुख आणि तंत्रज्ञानाधिष्ठित सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने पुणे येथे सुरू झालेल्या मॉडेल कार्यालयाची दखल केंद्राने घेतली. यातूनच या कार्यालयाची उपयोगिता लक्षात येते.

- चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news