AI Fake Video Case: एआयनिर्मित बनावट व्हिडिओप्रकरणी महाराष्ट्र सायबरकडून गुन्हा दाखल; केंद्र सरकारविरोधी अपप्रचाराचा होता आरोप

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या फॅक्ट चेक युनिटने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
AI
AIPudhari
Published on
Updated on

मुंबई: केंद्र सरकारविरोधात दिशाभूल करणारा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचा संशय असलेल्या व्हिडिओप्रकरणी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (पीआयबी) च्या फॅक्ट चेक युनिटने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे.

तक्रारीनुसार, सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये दिल्ली पोलिसांच्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा चेहरा आणि आवाज एआयच्या साहाय्याने बनावट पद्धतीने वापरण्यात आला.

AI
Bhiwandi Building Collapse: भिवंडीत १० बळींनंतर बिल्डर, कंत्राटदारावर गुन्हा

संबंधित अधिकारी केंद्र सरकारविरोधात वक्तव्य करत असल्याचा आभास निर्माण करण्यात आला. मात्र, पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये हा व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि एआय-निर्मित असल्याचे स्पष्ट झाले. सायबर पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे.

व्हिडिओची निर्मिती, प्रसार आणि त्यामागील सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिया खात्यांचा तपास, आयपी पत्ते, डिजिटल उपकरणे आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुरावे तपासले जात आहेत.

AI
RBI Foreign Investment Inflow: देशात नव्याने ४० अब्ज डॉलर्सचा ओघ; आरबीआयने उचललेल्या पावलांना मिळाले मोठे यश

तपास यंत्रणांच्या मते, एआय आधारित डीपफेक तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारी संस्थांबाबत चुकीची माहिती पसरविणे, जनतेची दिशाभूल करणे आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न झाल्याचा संशय आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू असून, संबंधित सोशल मीडिया हँडल्सची माहितीही मागविण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news