Farmer Loans
मुंबई : शेतकऱ्यांना कृषी कर्जाचा पुरवठा झाला नाही तर त्याचा दुष्परिणाम अर्थव्यवस्थेसोबतच शेतकरी आत्महत्यांमध्ये होतो. त्यामुळे शेतकऱ्यांना 'सिबिल' मागू नका, हे वारंवार सांगितले तरी बँका 'सिबिल' मागतात. त्यावर आजच्या बैठकीतच तातडीने तोडगा सांगा. यापूर्वी अशा बँकांवर सरकारने एफआयआरपण केले आहेत. हा विषय तुम्हालाच गांभीयनि घ्यावा लागेल. रिझर्व्ह बँकेनेसुद्धा कृषी कर्जाबाबत स्पष्टता दिली आहे. जर कोणती बैंक शाखा सिबिल मागत असेल तर त्या शाखेवर कारवाई करण्यात येईल, असा निर्णय याच बैठकीत घ्यावा, अशा स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बँकांना तंबी दिली.
कृषी कर्ज पुरवठा वाढवण्यासाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी विशेष प्रयत्न करून यंदाच्या वर्षी दिलेले उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी या बैठकीत दिल्या.
कृषी कर्ज पुरवठा गांभीर्याने घ्या : एकनाथ शिंदे
यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृषी कर्ज पुरवठ्याचा विषय बँकांनी गांभीयनि घ्यावा. तसेच कर्ज पुरवठ्याचे शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. उद्योजकांना विशेषतः महिला उद्योजकांना बँकांनी सहकार्य करावे. महामुंबई क्षेत्रातही कर्ज पुरवठा वाढवण्यावर भर द्यावा. या क्षेत्रात विकासाच्या मोठ्या संधी असल्याचे शिंदे यांनी सांगितले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे सचिव, राज्यस्तरीय बैंकर्स समितीचे अध्यक्ष आदेश पांडे, सर्व विभागांचे सचिव, वरिष्ठ अधिकारी आणि राज्यस्तरीय बैंकर्स समितीचे सदस्य आणि विविध बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
४४ लाख ७६,८०० कोटींचा पतपुरवठा आराखडा मंजूर
'सिबिल' मागणाऱ्या बँक शाखेवर कारवाई
राज्यस्तरीय बँकर्स समितीची बैठक
परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र आघाडीवर
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, थेट परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे. दावोस मधून राज्यात १६ लाख कोटींची थेट गुंतवणूक आली आहे. महाराष्ट्र आता स्टार्टअप्सची राजधानी आहे. या क्षेत्राकडेही बँकांनी लक्ष द्यावे. त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. एमएसएमईमध्येही राज्य प्रथम क्रमांकावर असून त्यामध्ये गुंतवणुकीस चांगल्या संधी आहेत. बँकांनी आणि सरकारने मिळून एमएसएमईच्या केंद्र आणि राज्याच्या योजनांचा लाभ लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी एकत्र प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे राज्यासह देशाची अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच पर्यटन, सेवा क्षेत्र यावर बँकांनी प्रथमिकतेने लक्ष केंद्रित करावे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.