Maharashtra Davos Investment: मुख्यमंत्री फडणवीस दावोसला रवाना; महाराष्ट्रासाठी जागतिक गुंतवणुकीवर लक्ष

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभाग, परकीय गुंतवणूक व रोजगारनिर्मितीसाठी अनेक सामंजस्य करार अपेक्षित
Maharashtra Davos Investment
Maharashtra Davos InvestmentPudhari
Published on
Updated on

मुंबई : ‌‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम‌’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गुंतवणूक परिषदेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जाणार आहेत. हा आठ दिवसांचा दौरा आहे.

Maharashtra Davos Investment
Navi Mumbai Postal Voting: नवी मुंबईत केवळ 1485 कर्मचाऱ्यांनी केले टपाली मतदान

या परिषदेमध्ये महाराष्ट्रात जास्तीत जास्त परकीय गुंतवणूक आणण्याच्या हेतूने आणि औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे. दावोस येथे 17 ते 24 जानेवारीदरम्यान जागतिक आर्थिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेसाठी जगभरातील विविध देशांमधील, राज्यांतील प्रतिनिधींबरोबरच मोठमोठ्या नामांकित कंपन्यांही सहभागी होणार आहेत.

Maharashtra Davos Investment
Mumbai Municipal Election: मुंबईतील 100 लढती लक्षवेधी; शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक थेट सामना

दौऱ्यात फडणवीस यांचे भरगच्च कार्यक्रम असणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त मुख्य सचिव अश्विनी भिडे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव पी. अन्बलगन, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, मुख्यमंत्र्यांचे सल्लागार कौस्तुभ धवसे आदी या दौऱ्यात सहभागी होणार आहेत.

Maharashtra Davos Investment
Mumbai Indians vs UP Warriors WPL: मुंबई इंडियन्स आज यूपी वॉरियर्सशी आमनेसामने

अनेक सामंजस्य करार होणार

या महत्त्वपूर्ण दौऱ्यात जागतिक पातळीवरील उद्योगांसोबत अनेक सामंजस्य करार होणार असून, मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याबरोबरच यातून रोजगारनिर्मितीचे उद्दिष्टदेखील साध्य केले जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news