

मुंबई : मुंबई महानगरपालिकेसाठी गुरुवारी मतदान होत असून 100 लढती लक्षवेधी ठरणार आहेत. या लढती शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक यांच्याच होत असल्याने मुंबईकरांचे त्याकडे विशेष लक्ष लागून आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला यावेळी विशेष महत्त्व आले आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फुट, ठाकरे बंधूंचे झालेले मिलन यामुळे निवडणूक प्रचार चांगलाच रंगला. आता कोण बाजी मारणार याकडे मुंबईकर लक्ष लागून आह. यात शिवसेना फुटीमुळे या निवडणुकीत शिवसैनिक विरुद्ध शिवसैनिक अशी लढत होत आहे. या तमुंबई शहरात 20, पश्चिम उपनगरात 50 पेक्षा जास्त तर पूर्व उपनगरात 30 ठिकाणी या लक्षवेधी लढती होणार आहेत. यात कोणतीशिवसेना बाजी मारणार हे शुक्रवारी दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.
पूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद.. शिवसेना जिंदाबाद.. अशी घोषणा देणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरले आहेत. त्यामुळे ठाकरे बंधूसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठीही या लढती प्रतिष्ठेच्या असून त्या जिंकण्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी दिवस-रात्र एक केली आहे.
आपापल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून यावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना (उबाठा)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे व अन्य नेते मैदानात उतरले होते.
शहर
185 : टी एम जगदीश (ठाकरे) - रवी राजा (भाजपा)
192 : यशवंत किल्लेदार (मनसे) - प्रीती पाटणकर (शिंदे)
194 : निशिकांत शिंदे (ठाकरे)- समाधान सरवणकर (शिंदे)
204 : अनिल कोकीळ (शिंदे) - किरण तावडे (ठाकरे)
209 : यामिनी जाधव (शिंदे) - हसीना माहीमकर (मनसे)
191 : विशाखा राऊत (ठाकरे) - प्रिया सरवणकर गुरव (शिंदे)
199 : किशोरी पेडणेकर (ठाकरे) वंदना गवळी (शिंदे)
196 : पद्मजा चेंबूरकर (ठाकरे) - सोनाली सावंत (भाजपा)
208 : रमाकांत रहाटे (ठाकरे) - विजय लिपारे (शिंदे)
222 : संपत ठाकूर (ठाकरे गट) रिटा मकवाना (भाजपा)
(काँग्रेस) - फोरम परमार ( ठाकरे)
2 तेजस्विनी घोसाळकर (भाजपा) - धनश्री कोलगे (ठाकरे)
4 संजना घाडी ( शिंदे) - राजू मुल्ला (ठाकरे)
3 प्रकाश दरेकर (भाजपा) रोशनी गायकवाड (ठाकरे)
7 गणेश खणकर (भाजपा) - सौरभ घोसाळकर (ठाकरे)
61 राजुल पटेल (शिंदे) - सेजल सावंत (ठाकरे)
63 देवेंद्र (बाळा) आंबेरकर (ठाकरे) रुपेश सावरकर (भाजपा)
64 सबा हारून खान (ठाकरे) - सरिता राजपुरे (भाजपा)
95 चंद्रशेखर वायंगणकर (अपक्ष ठाकरे) हरी शास्त्री (ठाकरे)
90 तुलीप मिरिंडा (काँग्रेस) - ज्योती उपाध्याय (भाजपा)
पूर्व उपनगर
126 अर्चना भालेराव (भाजपा) शिल्पा भोसले (ठाकरे)
131 राखी जाधव (भाजपा) वृषाली सावक (ठाकरे)
164 हरिष भांदिर्गे भाजपा साईनाथ साधू कटके (ठाकरे)
168 अनुराधा पेडणेकर भाजपा सुधीर खातू (ठाकरे)
144 दिनेश पांचाळ भाजपा निमिष भोसले (ठाकरे)
149 सुषम सावंत भाजपा अविनाश मयेकर (मनसे)