

नवी मुंबई : महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज (दि. 15) मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात लढत होणार आहे. मात्र,आजच महानगरपालिका निवडणुकांसाठी मतदान होत असल्याने, हा सामना प्रेक्षकांविना खेळवला जाण्याची दाट शक्यता आहे. निवडणूक ड्युटीमुळे सामन्यासाठी पुरेसा बंदोबस्त पुरवणे शक्य नसल्याचे स्थानिक पोलिसांनी ‘बीसीसीआय’ला कळवले आहे.
येथील डी. वाय. पाटील स्टेडियमची खेळपट्टी फलंदाज आणि गोलंदाज दोघांसाठी पूरक मानली जाते. सुरुवातीच्या षटकांत वेगवान गोलंदाजांना मदत मिळू शकते. मात्र, एकदा स्थिरावल्यानंतर फलंदाज येथे मोठे फटके खेळू शकतात.
या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या 165 ते 168 च्या दरम्यान असते. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यातील आतापर्यंतच्या 7 सामन्यात मुंबई इंडियन्सने 5 सामन्यात विजय मिळवून वर्चस्व राखले तर यूपी वॉरियर्सला 2 सामन्यांत विजय मिळवता आला आहे.
मुंबई इंडियन्स महिला वि. यूपी वॉरियर्स महिला
वेळ : सायंकाळी 7.30 वाजता